MNS Chief Raj Thackeray | मराठी माणसासाठी बाळासाहेबांनी सत्तेला लाथ मारली, राज ठाकरेंनी दिला बाळासाहेबांच्या आठणवणींना उजाळा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राचा मुख्यमंत्री (Maharashtra CM) मराठीच असेल दुसरा कुणी असणार नाही, असं सांगून बाळासाहेब पुन्हा झोपले. मराठी माणसासाठी बाळासाहेबांनी सत्तेवर लाथ मारली हे त्याच क्षणी समजलं अशा शब्दात 1999 मध्ये घडलेला किस्सा मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी सांगितला. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या तैलचित्राचे अनावरण (Oil Painting Inauguration) करण्यात आले. या सोहळ्याला राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी उपस्थिती राहून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.

 

राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी सांगितले की, 1999 ची निवडणूक (Election-1999) झाली. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) होते. काही कारणास्तव मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपची युती (Shiv Sena-BJP Alliance) सरकार अडलं होतं. स्वाक्षरी होत नव्हती. दुपारची साडे तीनची वेळ होती. मातोश्रीवर दोन गाड्या लागल्या. त्यातून प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) आणि 2-3 भाजप नेते बाहेर आले. आम्ही बाळासाहेबांना भेटण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी मला सांगितले. मी म्हटलं साहेब झोपलेत. उठल्यावर भेटा, परंतु अर्जंट आहे. त्यावर बाळासाहेब भेटणार नाहीत असं मी म्हटलं. तेव्हा आज आपलं सरकार बसतंय. सुरेश जैन (Suresh Jain) युतीचे मुख्यमंत्री असतील हे ठरलं आहे हे बाळासाहेबांच्या कानावर घालायचं आहे, असा निरोप त्यांना द्या.

त्यानंतर मी हा निरोप देण्यासाठी वरच्या रुममध्ये गेलो. काका झोपले होते.
त्यांना दोन-तीनदा आवाज देऊन उठवलं. निरोप दिला. सुरेश जैन यांना मुख्यमंत्री करायचंय आणि ते आमदार खेचून आणतील असा निरोप मी दिला.
तेव्हा बाळासाहेब म्हणाले, त्यांना सांग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच बसेल दुसरा कोणी बसणार नाही.
हे सांगून बाळासाहेब परत झोपले. मराठी माणसासाठी बाळासाहेबांनी सत्तेवर लाथ मारली हे त्यावेळी समजलं.
मराठीसाठी, हिंदुत्वासाठी कडवटपणा त्यांच्यात होता, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

 

Web Title :- MNS Chief Raj Thackeray | mns president raj thackeray brought to light the memories of balasaheb thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kasba By-Election | कसबा पोटनिवडणुकीसाठी मास्टर प्लॅन तयार, नाना पटोलेंची पुण्यात माहिती

Sanjay Gaikwad | ‘बाळासाहेब जिवंत असते तर संजय राऊतांना…,’ शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांची संतप्त टीका

Amol Mitkari | राज्यपालांचा राजीनामा म्हणजे, उशीरा सुचलेले शहाणपण; अमोल मिटकरींची खोचक टीका