MNS Chief Raj Thackeray | उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र अन् अजित पवारांचे कौतुक, राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी काल एका वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. या मुलाखतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी आपले चुलत बंधू आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली. तर दुसरीकडे विकासकामांच्या मुद्यावरुन राष्ट्रवादीचे नेते (NCP) अजित पवार (Ajit Pawar) याचे कौतुक केल्याचे पहायला मिळाले.

 

राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांना या मुलाखतीमध्ये मागील काही वर्षात राज्यातील राजकारणात होत असलेल्या बदलांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले, लोकांना चुकीचं काम करणाऱ्या राजकारण्यांना शासन केल्याशिवाय असे प्रकार थांबणार नाहीत. परंतु जनता शासन करते कोणाला? ज्यांनी विकासकामे (Development Works) केली त्यांनाच निवडणुकीत शासन केले जाते. नाशिकमध्ये (Nashik) आम्ही विकास केला, मात्र तिथे लोकांनी आम्हाला शासन केलं. राजकीय मतभेद असले तरी अजित पवारांनी पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) काम केले, हे मान्यच कारवं लागेल. मात्र त्यांचीही तेथील सत्ता गेली, असं राज ठाकरे म्हणाले.

 

राज ठाकरे यांनी मागील काही महिन्यात घेतलेल्या सभांमध्ये अजित पवार यांच्यावर टीका केली होती.
मात्र, राज ठाकरे यांनी पिंपरी चिंचवडमधील विकासकामांवरुन अजित पवार यांची स्तुती केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

उद्धव ठाकरेंवर टीका करताना राज ठाकरे म्हणाले…
मुलाखतीत बोलताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीबाबत जोरदार टीका केली.
तो माणूस बोलतो वेगळे आणि करतो वेगळे. विश्वास ठेवण्यासारखे काही नाही. बाकीच्या लोकांचे मला वाईट वाटते,
परंतु हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही. आज पुत्रप्रेमामुळे शिवसेना बुडाली. चांगल्या काळात सत्तेवर यायचे,
संपत्ती गोळा करायची आणि मग असला वाईट काळ आला की, बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) नावावर सहानुभूती मिळवायची.
एवढेच उद्योग सुरु आहेत, असे ते म्हणाले.

 

Web Title :- MNS Chief Raj Thackeray | mns president raj thackeray praised ncp leader ajit pawar for the development of pimpri chinchwad city pcmc

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Amol Mitkari | ‘आमदार झाल्यावर मी हवेत होतो, त्यानंतर…’, राष्ट्रवादीच्या आमदाराची थेट कबुली

 

Pune Fire News | सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथील दुकानांना भीषण आग; तीन दुकाने आगीत भस्मसात

 

Eknath Shinde | उद्धव ठाकरेंनी झेड सुरक्षा नाकारली का? शंभुराजे देसाईंच्या दाव्यावर CM एकनाथ शिंदे म्हणाले…