MNS Chief Raj Thackeray | ‘मी पुढची निवडणूक जिंकणार आणि…’, मनसे प्रमुख राज ठाकरेंचे मोठे वक्तव्य

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – रविवारी राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी गटप्रमुखांचा एक मेळावा घेतला होता. यानंतर राज ठाकरे पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी कंबर कसली असून कार्यकर्त्यांना जोमाने काम करण्याची सूचना केली आहे. तसंच पुन्हा एकदा मनसे कार्यकर्त्यांकडे सत्तेची चावी सोपवण्याच्या आश्वासनाचा पुनरुच्चार केला आहे. राज ठाकरे यांनी ट्वीट करुन कार्यकर्त्यांना विनंती केली आहे.

 

राज ठाकरेंनी ट्वीटमध्ये म्हंटले आहे की, “मी माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना विनंती करतो की, त्यांनी आगामी निवडणुकांत प्रामाणिकपणे कामे करावीत आणि आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात. मी तुम्हाला शब्द देतो, की हा राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) त्यानंतर निवडणूक जिंकेल आणि सत्ता तुमच्या हातात सोपवेल.”

 

यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी, मी तुम्हाला सत्तेच्या खूर्चीवर बसवणार असल्याचे म्हटले होते. मी तुम्हालाच सत्तेच्या खुर्चीवर बसवणार. मी सत्तेच्या खुर्चीवर उडी मारुन बसणार नाही, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला होता. लवकरच आपली सत्ता येईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला होता.

राज ठाकरे गोरेगावच्या सभेत काय म्हणाले ?
सुसंस्कृत महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा खालावत चालला आहे. महिला नेत्यांवर खालच्या पातळीवर टीका होत आहे.
जातीपातींचे विष राजकारणात कालवले जात आहे. देश पातळीवर राष्ट्रपुरुषांची सुरु असलेली बदनामी भाजप आणि काँग्रेसने त्वरीत थांबवावी,
असे राज ठाकरे गटाध्यक्षांच्या मेळाव्यात बोलत होते. कलुषीत वातावरणामुळे उद्योग, युवक आणि युवती देशाबाहेर जात असून,
आपण महाराष्ट्र कुठे घेऊन चाललो आहोत, याचे भान राज्यातील नेत्यांनी ठेवावे. राज्यातून उद्योग जात असून,
केंद्र सरकारने केवळ गुजरात न करता अन्य राज्यांकडे समान वृत्तीने पाहावे. सगळयाच राज्यांचा विकास झाला पाहिजे.
तसेच राज्यपाल यांचा मान आम्ही राखतो, म्हणून त्यांनी वाटेल तसे बोलू नये. महाराष्ट्रात शिव्यांची कमी नाही,
असेही यावेळी राज ठाकरे म्हणाले.

 

Web Title :- MNS Chief Raj Thackeray | mns raj thackeray tweet urge activist to work diligently and sincerely in the forthcoming elections

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Meena Deshmukh | दुर्देवी ! ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचे अपघाती निधन

NCP MP Supriya Sule | महाराष्ट्रातील अस्मितेसाठी राजकारण बाजूला ठेऊन सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढण्याची गरज – सुप्रिया सुळे

Udayanraje Bhosale | ‘युगपुरुषांची प्रतिमा मलीन करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा’ – उदयनराजे भोसले