MNS Chief Raj Thackeray | अनेकदा मेट्रो रिकामीच धावते, पुण्यात मेट्रोची गरज काय?; राज ठाकरेंनी उपस्थित केला प्रश्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात मेट्रोची (Pune Metro) गरज काय? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी उपस्थित केला आहे. पुण्यात 2022 मध्ये मेट्रोचं उद्घाटन झालं. परंतु अद्यापही कमी अंतर असलेल्या वनाज ते गरवारे (Vanaj to Garware) याच मार्गावर मेट्रो धावत आहे. यामध्ये अनेकवेळा मेट्रो रिकामीच धावत आहे. त्यामुळे पुण्यात मेट्रोची गरज आहे का? असा सवाल राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी केला आहे. पुण्यातील सहजीवन व्याख्यानमालेत ‘नवं काहीतरी’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.

 

राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) म्हणाले, पुणे मेट्रोचे काम सुरु असून त्यात एका मार्गावर मेट्रो धावत आहे. लांबच्या पल्ल्यासाठी मेट्रोचा वापर केला जातो. त्यामुळे पुण्यात मेट्रोची खरचं गरज आहे का? असा सवाल त्यांनी केला. प्रत्येक शहराची वेगवेगळी मानसिकता असते. शहराचा वेग वेगळा असतो. त्या मानसिकतेप्रमाणे शहर घडवलं पाहिजे आणि शहरांची उभारणी केली पाहिजे. पुणे, नागपूर या शहरांची मानसिकता मेट्रो नसून ती दुचाकीची प्रवास करण्याची असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

 

मानसिकता बदलण्यास वेळ लागणार
राज ठाकरे पुढे म्हणाले, पुर्वीच्या काळात लोक जसे शेले बांधून घोड्यावर बसून प्रवास करायचे तसे पुण्यात चेहऱ्यावर शेला बांधून दुचाकीवरुन प्रवास करताना पहायला मिळतात.
ज्या शहरात ही मानसिकता आहे त्या शहरात मेट्रोचा जीना चढून मेट्रोने प्रवास लोक कसा करतील? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
ही मानसिकता बदलण्यास वेळ लागणार आहे. मात्र त्याआधीच आपण मेट्रो सारख्या प्रकल्पावर मोठा खर्च करुन ठेवत असल्याचे ठाकरे म्हणाले.

मेट्रो रिकाम्याच धावातात
मेट्रो प्रकल्पासाठी कोट्यावधीचा खर्च केला जातो. यानंतर या मेट्रो रिकाम्याच धावतात.
शहराची मानसिकता पाहून शहराची उभारणी केली पाहिजे.
यामध्ये लोकांचे मत आणि त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या पाहिजेत.
शहरामध्ये उपाययोजना करताना नागरिकांना कोणी विचारात नाही त्यामुळे नागरिक कोणाला विचारत नाहीत,
महत्वाचे म्हणजे हा प्रश्न आपल्याला पडत नाही. यामुळे कोट्यावधीचा खर्च होतो, असे राज ठाकरे म्हणाले.

 

Web Title :- MNS Chief Raj Thackeray | no need of metro rail in pune said raj thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Buldhana ACB Trap | 1 लाखाची लाच घेताना उपजिल्हाधिकारी, वकील, वरिष्ठ लिपीक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime | मुलुंड येथील बनावट कॉल सेंटरद्वारे महिलेची फसवणूक करण्याऱ्या आरोपीस जामीन मंजूर

Winter Session 2022 | चर्चेशिवाय, विरोधकांच्या अनुपस्थितीत महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक मंजूर…