MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंच्या अल्टिमेटमला काही तास शिल्लक, मुंबई पोलिसांकडून कारवाईला सुरुवात; 15000 हजार MNS कार्यकर्त्यांना नोटीस देऊन मुंबई सोडण्याचे दिले आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मशिदीवरील भोंग्याचे (Azaan On Loudspeakers) प्रकरण चांगलेच तापले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी भोंगे उतरवण्यासाठी अल्टीमेटम दिला आहे. राज ठाकरे यांच्या अल्टीमेटमला अवघे काही तास शिल्लक राहिले असताना महाराष्ट्र पोलिसांनी (Maharashtra Police) कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील अनधिकृत भोंगे हटवण्याबाबत राज्य सरकारला (Maharashtra State Government) इशारा दिला होता. 1 मे रोजी औरंगाबाद येथे झालेल्या सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी हा इशारा दिला होता. त्यामुळे राज्यातील पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत.

 

पोलीस महासंचालक रजनीश सेठ (DGP Rajneesh Seth) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, जर कुणी कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला तर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.
औरंगाबाद पोलीस आयुक्त मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या भाषणाची तपासणी करत आहेत.
औरंगाबाद पोलीस त्यांच्यावर कारवाई करण्यास सक्षम आहेत.
मनसेच्या 15 हजार कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई (Preventive Action) करण्यात आली आहे.
अनेक जणांना मुंबई सोडण्याचे आदेश दिले आहेत. जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

… तर कठोर कारवाई – DGP
राज्याचे गृहमंत्री (Maharashtra Home Minister) दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्या बैठकीनंतर पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी पत्रकार परिषद घेतली.
यावेळी त्यांनी राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्याचे आवाहन नागरिकांना केले.
ते म्हणाले, स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात बैठका घेतल्या जात आहेत.
राज्यात कोणालाही कायदा हातात घेता येणार नाही.
जे कायदा बिघडवण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर कठोर कारवाई (Strict Action) केली जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

 

राज ठाकरेंवर गुन्हा दाखल
मनसे प्रमुख राज ठाकरे यांची 1 मे रोजी औरंगाबादमध्ये सभा (Aurangabad Public Rally) झाली.
सभा घेण्यासाठी औरंगाबाद पोलिसांनी (Aurangabad Police) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना 16 अटी (Condition) घातल्या होत्या.
मात्र सभेत 12 अटींचे उल्लंघन केल्याने सभेचे आयोजक राजीव जावळीकर (Organizer Rajiv Jawalikar) व राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबाद येथील सिटी चौक पोलीस ठाण्यात (City Chowk Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता (Aurangabad CP Nikhil Gupta) यांनी राज ठाकरे यांच्या सभेला 16 अटी घालून परवानगी दिली होती.
मात्र, 12 अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी सीटी चौक पोलीस ठाण्यात भादंवि कलम 116, 117, 153 अ आणि मुंबई पोलीस कायदा (Mumbai Police Act) अधिनियम 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी अशोक गिरी यांची नेमणूक केली आहे.

 

Web Title :- MNS Chief Raj Thackeray | notice to 15000 mns workers order to leave mumbai action against raj thackeray today says maharashtra police DGP Rajneesh Seth

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा