पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) आतापासूनच मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आले आहेत. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते आज (रविवार) पुण्यात नवीन पक्ष कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर माध्यमांशी बोलताना, निवडणुकांमध्ये परिस्थितीनुसार एकला चलो रे अशी भूमिका मनसेची असेल, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
MNS Chief Raj Thackeray on election reservation in pune mns office ceremony
प्रसारमाध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, या कार्यालयातून निवडणुकीच्या तयारीची सुरुवात झालीय का ? तर हो झालीय. आगामी निवडणुकांमध्ये मनसेचे वातावरण चांगलंच असेल. सध्या माझं इंजिन मीच चालवतोय. निवडणुकांमध्ये परिस्थितीनुसार एकला चलो रे अशी भूमिका राहील, असंही राज ठाकरे म्हणाले.
तर मग कुठं आडलंय ?
आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) वेळेला मुंबईला मोर्चा निघाला होता. त्यावेळी सगळेच नेते गेले होते. त्यावेळी सगळ्यांना मान्य होतं तर मग कुठं आडलंय ? केंद्राच्या सरकारला मान्य आहे राज्य सरकारला मान्य आहे. मग अडवलंय कुणी ? कोर्टात व्यवस्थित मांडल जात नाही का ? फक्त माथी भडकावयची आहेत का ? असा सवाल राज ठाकरे यांनी यावेळी केला.
कोण कुणाचा शत्रु आहे हेच कळत नाही
सगळ्यांना एका व्यासपीठावर बसवा आणि विचारा. कोण कुणाचा शत्रु आहे हेच कळत नाही. समाजाचे प्रश्न आले की तोंड फिरवायची. आता समाजाने विचारलं पाहिजे. आरक्षण प्रकरणी राजकारण आहे का काय आहे हे समाजाने बघितलं पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले.
मी राज मोरे होणार नाही, राज ठाकरेच राहणार
विमातळाच्या नामकरण प्रश्नावर राज ठाकरे यांना विचारले असता राज ठाकरे म्हणाले, विमानतळ नाव प्रकरणी मी सर्व बोललो आहे. मी पुण्यात स्थायिक झालो तर मी राज मोरे होणार नाही, राज ठाकरेच राहणार आहे. विमानतळ फक्त शिफ्ट होत आहे, तर नाव बदलण्याचा प्रश्नच येत नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
खडसेंच्या CD ची वाट पाहतोय
ईडीच्या (ED) कारवाईवर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले, काँग्रेस असताना देखील असाच गैरवापर करण्यात आला होता. भाजप असतानाही तोच वापर होतोय. ईडीचा बाहुली म्हणून वापर करु नये. ज्यांनी खरे गुन्हे केले ते गुन्हेगार मोकाट फरत आहेत. मी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या सीडीची वाट पाहतोय, असं ठाकरे म्हणाले.
White Fungus | काळी पेक्षा पांढरी बुरशी अधिक धोकादायक का आहे? जाणून घ्या कारणे, लक्षणे आणि उपचार