राज ठाकरेंनी केलं ट्विट, म्हणाले – ‘आज महत्मा गांधी असते तर…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मार्मिक शब्दात ट्विट केलं आहे. आज महात्मा गांधी असते तर… आज महात्मा गांधी असायला हवे होते… असे प्रत्येक भारतीयाला वाटते यातच गांधीजींची ताकद दिसून येते असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

राज ठाकरे म्हणतात, “‘आज महात्मा गांधी असते तर… आज महात्मा गांधी असायला हवे होते… ‘ असं प्रत्येक भारतीयाला गेली ७ दशकं वाटत राहिलं ह्यातच गांधींजींच्या शिकवणुकीची आणि योगदानाची ताकद दिसून येते. महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.”

राज ठाकरे यांनी केलेलं ट्विट सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. विशेष बाब अशी की, राज ठाकरे यांनी ही पोस्ट मराठी सोबतच इंग्रजीमध्येही शेअर केली आहे. आज महात्मा गांधी यांची 150वी जयंती आहे. गांधीजींची जयंती देभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. सोशल मीडियावर नजर टाकली तर लक्षात येईल की, अख्ख सोशल मीडिया गांधीमय झालं आहे. महात्मा गांधींना अभिवादन करणाऱ्या अनेक पोस्ट सध्या सोशलवरून शेअर होताना दिसत आहेत. महात्मा गांधींच्या विचारांची आणि शिकवणुकींची उजळणी केली जात आहे. सोशलवर मोठ्या संख्येने गांधीजींना आदरांजली वाहिली जाताना दिसत आहे.

दरम्यान राज ठाकरे यांनी महात्मा गांधींसोबतच भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनाही आदरांजली वाहिली आहे. आपल्या ट्विटमध्ये राज ठाकरे म्हणतात, “महान स्वातंत्र्यसैनिक आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना विनम्र अभिवादन”

Visit : Policenama.com