MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरे पुणे दौऱ्यावर, वसंत मोरेंची नाराजी दूर होणार?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) हे आजपासून दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करणार आहेत. तर दुसऱ्या दिवशी एका व्याख्यानमालेत सहभागी होणार आहेत. तसेच पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) बैठक घेणार आहेत. आगामी निवडणुका आणि पक्षबांधणीसाठी राज ठाकरे महाराष्ट्र दौरा करत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी कोकण, विदर्भ दौरा केला होता. त्यानंतर आता ते पुणे दौऱ्यावर असणार आहेत.

मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) आज पुण्यातील तीन पदाधिकाऱ्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर ते पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. पुण्यातील मनसे (Pune MNS) मध्ये मागील काही दिवसांपासून अंतर्गत वाद सुरु आहेत. यामुळे फूट पडली आहे. यासंदर्भात राज ठाकरे नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वसंत मोरेंची नाराजी दूर होणार?

पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे (Vasant More) हे पक्षाच्या निर्णयावर नाराज असल्याचे चित्र पहायला मिळत
आहे. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी दोन वेळा वसंत मोरे यांना राज ठाकरे यांनी चर्चेसाठी बोलावून घेतले होते.
परंतु त्यांची नाराजी कायम होती. यानंतर मनसे युवानेते अमित ठाकरे (Amit Thackeray) पुणे दौऱ्यावर आले
होते. त्यांनी देखील वसंत मोरे यांना भेटीसाठी बोलवून घेतले होते.
आता राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असून वसंत मोरे आणि राज ठाकरेंची भेट होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Web Title :- MNS Chief Raj Thackeray | raj thackeray is visiting pune for the first time after issuing a leaflet for office bearers

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Salman Khan | सलमान खान व एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानीचा ‘तो’ व्हिडिओ चर्चेत, वेधले सगळ्यांचे लक्ष

Rakhi Sawant | “महेश मांजरेकरांनी माझं नाव बदललं”, राखी सावंतने केला मोठा खुलासा

Maharashtra-Karnataka Border Dispute | कर्नाटक सरकारविरोधातील ठराव एकमताने मंजूर, मात्र उद्धव ठाकरेंची ‘ती’ मागणी नाकारली