MNS Chief Raj Thackeray | हनुमान चालिसानंतर आता बाल वेठबिगारी ! मनसेचे इंजिन नव्या विषयाकडे, राज ठाकरेंची सरकारकडे मागणी, कार्यकर्त्यांना दिले आदेश!!

मुंबई : MNS Chief Raj Thackeray | राज्यात नाशिक, अहमदनगर, ठाणे, पालघर अशा जिल्ह्यांमध्ये बाल वेठबिगारीचे प्रकार वाढत आहे. यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी शिंदे-फडणवीस सरकारकडे (Shinde-Fadnavis Govt) केली आहे. राज ठाकरे यांनी राज्यात लहान मुलांच्या वेठबिगारीच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज सोशल मीडियात एक पोस्ट लिहिली आहे.

सोशल मीडियावरील या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, मागील काही दिवसांपासून लहान मुलांना वेठबिगारी करण्यास भाग पाडले जात असल्याच्या बातम्या वाचल्या. ह्या बातम्या मन विषण्ण करणार्‍या आहेत. नाशिक, नगर, ठाणे, पालघर अशा जिल्ह्यांमध्ये वेठबिगारीचे प्रकार समोर येत आहेत. पैशासाठी मुलांवर वेठबिगारीची वेळ यावी, हे भीषण आहे. आज कायद्याने वेठबिगारीचे उच्चाटन झाले असले तरी ही प्रथा अस्तित्वात आहे, आणि प्रगत म्हणवणार्‍या महाराष्ट्रात या घटना आढळणे हे राज्याला शोभणारे नाही. (MNS Chief Raj Thackeray)

राज्यसरकारने सर्व जिल्हाधिकार्‍यांना ह्या घटनांचा छडा लावण्याचे निर्देश तात्काळ द्यायला हवेत.
वेठबिगारांचा शोध, सुटका आणि पुनर्वसन ह्याकडे प्रशासनाने कमालीच्या सहानुभूतीने लक्ष द्यायला हवे.
पण हे करताना एकूणच जागृत समाजाने पण पुढे यायला हवे.

पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, वेठबिगारी ही क्रूर प्रथा आहे, आणि तिच्या निर्मूलनासाठी समाजात सतर्कता हवी.
असे प्रकार तुम्हाला कुठेही आढळले तर तुम्ही पोलिसांची तक्रार करा किंवा जवळच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या
कार्यालयाला किंवा माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकाला सूचित करा, ते कायदेशीर मदत घेऊन कारवाई तर
करतीलच. पण गरज पडलीच तर वेठबिगारी करून घेणार्‍यांना महाराष्ट्र सैनिक आपल्या पद्धतीने धडा पण
शिकवतील.
या बातम्या परत कधीच वाचायला लागू नयेत हीच इच्छा.

Web Title :- MNS Chief Raj Thackeray | raj thackeray post on maltreatment of children made an important demand to the government and gave strict orders to the party workers

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Eknath Shinde Group Vs Uddhav Thackeray | शिंदे गटाचे उद्धव ठाकरे यांना आव्हान, म्हणाले – ‘तुम्ही शिवाजी महाराजांचा फोटो काढा, आम्ही…’