MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरे मंगळवारपासून पुणे दौऱ्यावर, वसंत मोरेंना भेटीसाठी…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) पुन्हा एकदा मंगळवारपासून पुण्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर ( Pune Tour) येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) पक्षातील विविध पदाधिकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच काही दिवसात त्यांची पुण्यात सभा होणार आहे. याबाबत नियोजन करण्यात येईल अशी चर्चा सुरु आहे. त्यातच मनसेचे (Pune MNS) माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांना फोन करुन बोलावलं असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.

 

भोंग्याच्या मुद्यावरुन (Azaan Loudspeakers) वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांना अध्यक्ष पदावरुन दूर करण्यात आले. त्यानंतर भोंग्याच्या आंदोलनामध्ये (Agitation) वसंत मोरे सहभागी झाले नसल्याचे दिसून आले. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले. पुण्यात रविवारी पुणे मनसेच्या कोअर कमिटीची बैठक (Core Committee Meeting) शहराध्यक्ष साईनाथ बाबर (City President Sainath Babar) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यानंतर पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता. कोअर कमिटीच्या निमंत्रण पत्रिकेत वसंत मोरे यांचे नाव नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मला पक्षातून डावललं जातंय असं मोरे म्हणाले होते. उद्या राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यांनी वसंत मोरे यांना फोन करुन बोलावलं आहे. या रविवारी झालेल्या मेळाव्यासंदर्भात झालेल्या बैठकीचा आढावा राज ठाकरे घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

पुढील आठवड्यात पुण्यात सभा
पुढील आठवड्यात राज ठाकरे यांचा पुणे दौरा निश्चित झाला आहे. 21 ते 28 मे दरम्यान त्यांचा पुणे दौरा होणार आहे.
याच कालावधीत पुणे शहरातील सर परशुरामभाऊ महाविद्यालय (Sir Parashurambhau College)
येथे राज ठाकरे यांची सभा होणार असल्याची माहिती मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली.
त्यासाठी पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी पोलीस आयुक्तांना (Police Commissioner) परवानगीचे पत्र पाठवले आहे.

 

Web Title :- MNS Chief Raj Thackeray | raj thackeray to visit pune from tuesday vasant more was called directly for a visit

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune NCP | महागाईसाठी तत्कालीन पंतप्रधानांना भाजपने बांगड्या पाठवल्या होत्या, तीच भेट सध्याच्या पंतप्रधानांना देण्याची वेळ आली; प्रशांत जगताप यांचा हल्लाबोल

 

EPFO | 6.5 कोटी नोकरदारांच्या खात्यात पैसे जमा करणार सरकार, ‘या’ नंबरवर तुम्ही चेक करू शकता बॅलन्स; जाणून घ्या

 

Smriti Irani In Pune | स्मृती इराणींच्या कार्यक्रमात BJP च्या कार्यकर्त्यांकडून NCP च्या महिला पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण