MNS Chief Raj Thackeray | ‘वसंत, तू पुण्यात मिसळ महोत्सव घे’ – राज ठाकरे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी मुस्लिम समाजाला मशिदींवरील भोंगे (Azaan On Loudspeakers) काढण्याचे आवाहन केले होते. 3 मे पर्यंत भोंगे काढण्याचा अल्टिमेटम त्यांनी दिला होता. त्यानंतर 4 मे पासून मनसैनिक हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावतील, असे म्हणत राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी इशारा दिला होता. त्यानुसार राज्यातील मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यामध्ये पुण्यातील मनसेचे (Pune MNS) कट्टर समर्थक असलेले वसंत मोरे (Vasant More) कोठेच दिसून आले नाहीत. तसेच काल करण्यात आलेल्या महाआरतीला देखील राज ठाकरे गैरहजर होते. त्यानंतर वसंत मोरे यांनी महाआरती झाल्यानंतर राज ठाकरे यांची भेट घेतली.

 

वसंत मोरे मनसेच्या कार्यक्रमामध्ये सहभागी न झाल्याने पुन्हा एकदा त्यांच्या पक्ष सोडण्याबद्दलच्या चर्चा रंगल्या होत्या. विशेष म्हणजे आंदोलनादिवशी (Agitation) ते तिरुपती बालाजीला (Tirupati Balaji) देवदर्शनासाठी गेले होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. परंतु मोरे यांनी हा दौरा पुर्वनियोजित असल्याचे सांगत स्पष्टीकरण दिले. विशेष म्हणजे शनिवारी कात्रज येथे मोरे यांनी महाआरतीचे आयोजन केले होते. या महाआरतीला राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) हे पुण्यात असताना देखील गैरहजर होते.

यावर बोलताना मोरे म्हणाले, राज साहेब ठाकरे काल पुण्यात येणार असल्याचं मला माहित नव्हतं.
प्रसार माध्यमांमुळेच ते पुण्यात येणार असल्याचे समजले. पण त्यापूर्वी मी महाआरतीचं आयोजन केलं असल्याची माहिती त्यांना मेसेज करुन दिली होती.
तसेच या महाआरतीला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
या महाआरतीनंतर आज (रविवार) राज ठाकरे यांची पुण्यातील ‘राजमहल’ या निवासस्थानी भेट घेतल्याचं मोरे यांनी सांगितलं.

 

या बैठकीमध्ये आजवर झालेल्या घडामोडींबाबत चर्चा केली.
तसेच, महाआरतीच्या नियोजनाचे ही त्यांनी कौतुक केले.
राज ठाकरे यांना महाआरतीला येता आलं नाही.
पण, वसंत तू मिसळ महोत्सव घे, मी नक्की येईन… असे आश्वासन राज ठाकरे यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच लवकरच एका कार्यक्रमाची तारीख जाहीर करणार असून त्या कार्यक्रमाला राज ठाकरे निश्चित येतील असे मोरे यांनी सांगितले.

 

Web Title :- MNS Chief Raj Thackeray | raj thackeray vasant more you take misal mahotsav this is the advice of raj thackeray during his visit to pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Weight Loss Tips | वजन कमी करायचंय? ‘हे’ 8 पदार्थ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खा, होईल फायदा, जाणून घ्या

 

Vicky Kaushal Instagram Post | विक्की कौशलच्या ‘मदर्स डे’ पोस्टनं वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष, पोस्ट पाहून नेटकरी झाले भावूक..

 

Blood In Urine | यूरिनमध्ये रक्त येणे ‘या’ जीवघेण्या आजाराचा आहे संकेत, दुर्लक्ष करणे पडेल महागात!

 

Urfi Javed Crush Name | ‘या’ अभिनेत्यानं चोरलं उर्फी जावेदचं हृदय, दुप्पट वयाच्या कलाकाराचं नाव घेत ती म्हणाली – ‘मला तो खूप आवडतो..’