व्यंगचित्रासाठी उध्दव ठाकरेंसह ‘या’ नेत्यांचे चेहरे ‘परफेक्ट’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – एकमेकांसोबत निवडणुका लढवायच्या दुसऱ्यासोबत सत्ता स्थापन करायची आणि सर्वाधिक आमदार असलेल्या पक्षाने विरोधी पक्षात बसायचं, हे दुर्देवी आहे. असे म्हणत राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधला.

राज्यातील निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा जिकंलेला पक्ष विरोधी पक्षात बसला आहे, नंतर त्याचा वाईट परिणाम होतो. हे महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगले नाही. पुढच्या पिढीला काय संदेश देणार, राज्याच्या निवडणुकीत जे घडले ते दुर्देवी घडले, असं राज ठाकरे म्हणाले.

व्यंगचित्रासाठी राजकारणातील कोणता चेहरा परफेक्ट आहे, असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारल्या नंतर ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे मंत्री उद्धव ठाकरे यांचा चेहरा देखील व्यंगचित्र काढण्यासाठी योग्य असल्याचे सांगितले. त्याचबरोबर राहुल गांधींचे वडील माजी पंतप्रधान राजीव गांधींचा चेहरा चांगला होता पण काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा चेहरा चांगला नसल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.