राज ठाकरेंच्या हाताला झाला ‘हा’ गंभीर आजार

पुणे  : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एका आजाराने ग्रासले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पुण्यातील एका खासगी कार्यक्रमला त्यांनी हजेरी लावली त्यावेळी त्यांच्या हाताला बँडेज लागल्याचे पहायला मिळाले. राज ठाकरे यांना टेनिस एल्बो या आजाराने ग्रासले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. राज ठकारे पुण्यातील कटारिया शाळेतील मैदनावर त्यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले होते त्यावेळी त्यांच्या हाताला बँडेज होते.

मागील आठवड्यापासून राज ठाकरे यांनी टेनिस एल्बो या आजाराने ग्रासले आहे. टेनिस एल्बो हा आजार हाताच्या कोपऱ्याला होत असतो. यापूर्वी सचिन तेंडूलकरला या आजाराने ग्रासले होते. त्यामुळे त्याला काही दिवस क्रिकेटपासून दूर रहावे लागले होते. राज ठाकरे यांना देखील हाच आजार झाला असून त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरु आहेत. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांच्या हाताला बँडेज दिसत होते. यावेळी त्यांनी आयोध्या निकालावर प्रतिक्रीय देताना म्हटले, की न्यायालयाच्या निकालाने आनंद होत आहे. आता लवकरात लवकर राम मंदिर बांधावे आणि सरकारने देशात रामराज्य आणावे.

टेनिस एल्बो म्हणजे काय ?
कोपरापासून महत्त्वाचे स्नायू दंडाच्या दिशेने गेलेले असतात. स्नायूंचा एक संच मनगट उचलण्याचे काम करतो. स्नायूंचा उगम कोपराच्या बाह्य दिशेने असतो. हा स्नायूंचा संच उगमस्थानी सुजला तर मनगट उचलण्यासाठी हालचाल झाल्यास वेदना ठरणारे ठरतं. साध्या साध्या हालचालींमध्येही वेदना होतात. कधी-कधी हस्तांदोलनामुळेही कळ येऊ शकते. हा आजार टेनिस किंवा बॅटमिंटने खेळ सतत खेळणाऱ्यांना होत असल्याने या आजाराला टेनिस एल्बो असे म्हणतात.

Visit : Policenama.com