‘CAA-NRC’ वर मनसेचं मोदी सरकारला ‘समर्थन’, 9 फेब्रुवारीला ‘मेगा’ रॅली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज मनसेच्या कार्यकर्त्यांचे अधिवेशन मुंबईत पार पडले. यावेळी पक्षांचा झेंडा लॉन्च करण्यात आला. त्यानंतर संध्याकाळी राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांनी संवाद साधला. राज ठाकरेंनी ‘माझ्या तमाम हिंदू बांधवांनो’ असे म्हणत भाषणाला सुरुवात केली आणि पक्षांचा नवा झेंडा आवडला का असे कार्यकर्त्यांना विचारले. यावेळी भाषणात देशात सुरु असलेल्या नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसी संबंधित बाबींवर भाष्य केले. यावेळी देशात अवैधपणे शिरलेल्या बांग्लादेशी, पाकिस्तानी मुसलमानांना देशाबाहेर काढला अशी भूमिका त्यांनी मांडली.

बांग्लादेशी, पाकिस्तानी मुसलमानांना हकलण्यासाठी मोर्चा –
राज्यात ज्या घडामोडी घडल्या त्या टराटरा फाडायच्या आहेत पण त्या 25 मार्चला, येत्या 9 फेब्रुवारीला बांग्लादेशी, पाकिस्तानी मुसलमानांना भारतातून हकलून देण्यासाठी मनसे आझाद मैदानावर मोठा मोर्चा काढेल असे ही राज ठाकरेंनी स्पष्ट केले. युरोप, अमेरिकेत जा, तेथे लोकांची सुरक्षा महत्वाची आहे. जो माणूस बाहेरुन आला आहे त्यांना पहिल्यांदा पासपोर्ट विचारतात. पासपोर्ट नसेल तर दोन पर्याय, एक स्वत:च्या देशात परत जा, अन्यथा तुरूंगात जा, तुम्ही निवडा काय करायचं. तुमची चौकशी होते. आपल्या देशात जेव्हा कोणी येते तर आपण त्यांना विसरुन जातो.

आपण अनेक ज्वलामुखीवर, बॉम्बवर बसलो आहोत. सर्वात महत्वाचं आहे की या देशातील अवैधपणे आलेले बांग्लादेशी पाकिस्तानी मुसलमानांना हकलून दिलं पाहिजे, त्यासाठी केंद्र सरकाराला माझे समर्थन आहे. आता मी देशाच्या गृहमंत्र्यांना भेटून, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून याची माहिती देणार आहे. देशातील अनेक भाग आहेत, जेथे काय होतंय हे काही कळत नाही, परंतु मला जसं समजतंय, पोलिसांकडून महिती मिळतेय की काही तरी मोठं होतंय, काही तरी मोठं शिजतंय, असं होत असेल तर पोलिसांना मोकळे हात देणं आवश्यक आहे.

भारत काय धर्मशाळा आहे का ? कोणीही याचच आणि इथं येऊन बसायच. बांग्लादेशातून भारतात यायला फक्त 2,500 रुपये लागतात, पाकिस्तानातून भारतात नेपाळ मार्गे येतात. एनआरसी, सीएए बद्दल बोलण्याआधी ती समझोता एक्सप्रेस बंद करा, ती बस आधी बंद करा. उद्या जर युद्ध झालं तर आपल्या सैन्याला बाहेर जाण्याची गरज नसेल, त्यांना आधी देशातच लढावं लागेल.

कार्यकर्त्यांना इशारा –
कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर काही अक्षेपार्ह लिहिलं तर पदावरुन हटवण्यात येईल, उत्तम कामं करा, ते सोशल मिडियावर शेअर करा. आपल्या झेंड्यावर महाराज्यांची राजमुद्रा आहे. हा झेंडा हातत घ्याल तेव्हा तो कुठेही वेडावाकडा पडायला नको. ही राजमुद्रा आपली प्रेरणा आहे. निवडणूकीच्या वेळी मात्र हा झेंडा वापरायचा नाही. राजमुद्रेचा मान हा राखलाच गेला पाहिजे. त्यामुळे आजच सांगतोय की असा गोंधळ होता काम नये.

मी मराठी बरोबर हिंदु देखील आहे –
मराठीचे काय, हिंदुत्वाचे काय ? तर हे लक्षात ठेवा, मी मराठी देखील आहे आणि हिंदु देखील आहे. मी धर्मांतर केलं नाही. हे मी आज नाही याआधीही सांगितलं आहे. त्यामुळे आज पुन्हा सांगतो, माझ्या मराठीला हात लावण्याचा प्रयत्न केला तर मी मराठी म्हणून अंगावर जाईल आणि धर्माकडे बोट केलं तर हिंदू म्हणून अंगावर जाईल. त्याबाबत माझे विचार स्पष्ट आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like