मनसेच्या वर्धापनदिनी भल्या पहाटे राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यासाठी ट्विट, म्हणाले….

0
29
mns chief raj thackeray tweet mns party 15th anniversary
File Photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मंगळवारी (दि.9) 15 वर्धापन दिन आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसेने वर्धापन दिनाचा सोहळा रद्द केला आहे. वर्धापन दिनानिमित्त मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भल्या पहाटे ट्विट करून कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील माझ्या सर्व सहकाऱ्यांना वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा, असे ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

तसेच राज ठाकरे यांनी या ट्विटमध्ये # मनसेवर्धापनदिन # महाराष्ट्रधर्म # हिंदवीस्वराज्य # महाराष्ट्रप्रथम # राजठाकरे # महाराष्ट्र सैनिक अशा टॅशचाही वापर केला आहे. या ट्विटसोबत त्यांनी एक फोटोही शेअर केला आहे. शेअर केलेल्या फोटोत किल्ल्याच बुरुज असून त्याला फुलांच्या रंगबेरंगी माळांनी सजवण्यात आले आहे. नुकताच होणारा सूर्यादय आणि आकाशात उंच भरारी घेणारा एक पक्षी या फोटात दिसून येत आहे. दरम्यान दरवर्षी दादरच्या शिवाजी पार्कमध्ये मनसेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून वर्धापन दिन सोहळा रद्द करण्यात आला आहे.