कोरोनानं परिवारातील सदस्य गमावलेल्या पदाधिकार्‍यांचे राज ठाकरेंकडून सांत्वन

0
23
MNS Chief Raj Thackeray court issues non bailable warrant against raj thackeray in parli of beed district
file photo

पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. अशातच कोरोनामुळे कुटुंबातील सदस्य गमावलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सांत्वन केले आहे. राज ठाकरे यांनी दुःखात बुडालेल्या सर्व पदाधिका-यांच्या घरी पत्र पाठवून त्यांना धीर दिला आहे. प्रत्येक विभाग अध्यक्षाकडे ही पत्र संबंधित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी दिली आहे. ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांप्रती दाखवलेल्या आपुलकीचे पक्षात अन् पदाधिकाऱ्यांकडून कौतुक केले जात आहे.

पत्रातील मजकूर काय?
आपल्या कुटुंबातील सदस्याच्या निधनाची दुःखद वार्ता समजली. अतिशय वाईट वाटले. आपल्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा किती मोठा डोंगर कोसळला असेल याची कल्पना मी करु शकतो. इतक्या वर्षांचे आपलं नात क्षणार्धात अनंतात विलीन झालं. हा धक्का मोठा आहे. त्याला धीरानेच तोंड द्यायला पाहिजे.परिस्थिती दुःखाची असली तरी या काळात खंबीर राहून आपण सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी. एकत्र राहून या महामारीतून पुढचा मार्ग काढावा आपल्या या दुःखद क्षणी मी, माझे कुटुंबीय आणि माझे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व सहकारी आपल्या सर्वांच्या सोबत आहोत, आपल्या दुःखात सहभागी आहोत. आपल्या सर्वांना हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर देवो हीच मनोमन प्रार्थना. ईश्वर मृतात्म्यास सद्गती देवो.

आपला नम्र
राज ठाकरे