MNS Chief Raj Thackeray | ‘होय… माझ्याकडून दुर्लक्ष झालं, पण यापुढे…’, राज ठाकरेंकडून नागपूरची कार्यकारिणी बरखास्त

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) हे सध्या आठ दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर (Vidarbha) आहेत. या दौऱ्याच्या माध्यमातून राज ठाकरे यांच्याकडून पक्षसंघटनेचा आढावा घेतला जात आहे. त्यांनी काल आणि आज नागपुरात पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर आज दुपारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नागपुरातील मनसेची सर्व महत्वाची पदं बरखास्त करत असल्याची घोषणा केली. घटस्थापनेला नवे पदाधिकारी आणि कार्यकारिणी (Nagpur MNS Executive) जाहीर करेन, असं राज ठाकरेंनी (MNS Chief Raj Thackeray) पत्रकार परिषदेत सांगितलं.

मनसेची पद बरखास्त (MNS Post Dismissed) करण्याची वेळ आली म्हणजे तुमचे विदर्भाकडे दुर्लक्ष झालं असं वाटत का? असा प्रश्न राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांना विचारला असता त्यांनी उघडपणे याची कबुली दिली. ते म्हणाले, होय, माझ्याकडून आणि आमच्या सहकाऱ्यांकडून दुर्लक्ष झालं. पण यापुढे असं होणार नाही, असं सांगत त्यांनी एका वाक्यात विदर्भाकडे दुर्लक्ष झाल्याची कबुली दिली.

नागपुरातील मनसेची पदं बरखास्त करण्याचं कारण राज ठाकरे यांना विचारण्यात आले. यावर बोलताना ते म्हणाले, नागपुरात काही चुकीची कामं सुरु होती. पक्षाला 16 वर्ष झाली पण त्यामानानं अपेक्षित पक्ष वाढीचं काम नागपुरमध्ये झाले नाही. यामुळे पदं बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नव्या चेहऱ्यांना संधी देणं देखील महत्त्वाचं आहे. पक्षात काही तरुण फायरब्रँड कार्यकर्ते आहेत त्यांना पुढे आणले पाहिजे असं मला वाटतं.

‘त्या’ बातमीत काहीही तथ्य नाही

उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने
(Mahavikas Aghadi Government) चांगलं काम केलं होतं.
त्यामुळे आपण त्यांच्यासोबत जायला हवं, अशी मागणी कोणीतरी माझ्याकडे केली असल्याची बातमी एका वृत्तपत्रात आली आहे.
मात्र या बातमीत काहीही तथ्य नाही, असा खुलासा राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला केला.

Web Title :- MNS Chief Raj Thackeray | ‘Yes… neglected by me, but from now on…’, Raj Thackeray dismisses Nagpur executive

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Sushilkumar Shinde | कारस्थान करुन मला मुख्यमंत्रीपदावरुन हटवलं, सुशीलकुमार शिंदे यांचा पक्षाला घरचा आहेर

Shivsena MLA Nitin Deshmukh | ‘…तर मी महाराष्ट्राच्या विधानसभेत आत्महत्या करेन’, नितीन देशमुखांचा शिंदे गटाला थेट इशारा

Pune Accident |  हडपसर-सासवड रोडवर कंटेनर व शिवशाही बसचा भीषण अपघात