मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हाताला दुखापत

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  महाराष्ट्र नवनिर्माण(MNS) सेनेचे प्रमुख राज ठाकरे ( Raj Thackeray) यांच्या हाताला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी (दि. 12) संध्याकाळी टेनिस खेळताना ही दुखापत झाली आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार त्यांच्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे हेअर लाईन फ्रॅक्चर झाले आहे. दरम्यान, त्यांना झालेली दुखापत अधिक गंभीर नसल्याचेही सांगण्यात आले असून हिंदुजा रुग्णालयातील डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर ठाकरे यांच्या हाताला सपोर्टरही लावण्यात आले आहे.

राज ठाकरे यांचे खेळाप्रती आणि कलेप्रती असलेल प्रेम हे सर्वांच्याच परिचयाच आहे. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून लॉन टेनिस खेळायला सुरुवात केली आहे. यापूर्वी अनेकदा त्यांचे टेनिस खेळतानाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यापूर्वीही ठाकरे यांच्या हाताला दुखापत झाली होती. त्यांना यापूर्वी टेनिस एल्बोचा त्रास झाला होता. त्यावेळीही त्यांच्या हाताला सपोर्टर लावला होता. तसेच गेल्या वर्षी निवडणुकांदरम्यानही त्यांच्या हाताला दुखापत झाली होती. याप्रकारचीच दुखापत मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यालाही झाली होती. त्यानंतर त्याला बऱ्याच कालावधीसाठी क्रिकेटपासून दूर राहावे लागले होते.