रो-रो बोट प्रवासात राज ठाकरेंनी दंड भरला नाही, मनसेचे स्पष्टीकरण

पोलिसनामा ऑनलाईन – सार्वजनिक ठिकाणी नियम मोडल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दंड भरावा लागल्याचे वृत्त पूर्णपणे चुकीचे आहे. संबंधित वृत्त खोडसाळपणे दिल्याचे मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी ट्विटर हँडलवर एक पत्रक काढून स्पष्ट केले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अलिबाग दौर्‍या दरम्यान चुकीची आणि खोडसाळ बातमी देण्यात आली आहे. राज ठाकरे शुक्रवारी मुंबईहून अलिबागला गेले. त्यावेळी त्यांनी रो-रो फेरीने प्रवास केला. राज ठाकरे बोटीवरच्या मोकळ्या जागेत मास्क न घालता उभे होते. त्यावेळी त्यांनी सिगारेटही ओढली. सगळ्या प्रकारानंतर बोटीवरच्या अधिकार्‍यांनी राज ठाकरेंना दंड ठोठावला. मात्र सदर प्रवासात मी राज ठाकरेंसोबत होतो. अशी कोणतीही घटना घडलेली नाही असे मी ठामपणे सांगतो आहे. प्रसारित करण्यात आलेली बातमी पूर्ण चुकीची आणि खोडसाळ आहे. अशा बातम्यांमुळे लोकांची दिशाभूल होत असल्याचे सरदेसाई यांनी स्पष्ट केले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like