MNS | कालचा पिंजऱ्यातला वाघ आज मांजरीप्रमाणे बोलत होता …,मनसेचा संजय राऊतांना खोचक टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांची 102 दिवसानंतर जामिनावर सुटका झाली. तुरुंगातून बाहेर आल्यावर संजय राऊत याचे ठाकरे गटाच्या (Thackeray Group) कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. दरम्यान, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्यावर निशाणा साधला. राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला आता मनसेने (MNS) प्रत्युत्तर दिले आहे.

खासदार संजय राऊत जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला. यावेळी त्यांनी मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. आमचे मित्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माझ्यावर टीका करताना संजय राऊत यांना ईडीकडून (ED) अटक होईल, त्यांनी एकांतात स्वत:शी बोलण्याची प्रॅक्टिस करावी असे म्हटले होते. मला त्यांना सांगायचे आहे की, मला ईडीने जी अटक केली होती ती बेकायदेशीर (Illegal) होती असं कोर्टाने म्हटलं आहे. राजकारणात शत्रूच्याबाबतही आपण असं चिंतू नये की तो जेलमध्ये जावा. मी एकांतात होतो, जसं सावरकर (Savarkar) होते, अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) होते. मी माझा एकांत सत्कारनी लावला, असे संजय राऊत म्हणाले.

सूर बदले बदले हैं जनाब के…

राज ठाकरेंवर केलेल्या या टीकेला मनसेच्या गजानन काळे (Gajanan Kale) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
कालचा पिंजऱ्यातील वाघ आज मांजरीप्रमाणे बोलत होता, अशा शब्दात काळे यांनी राऊतांवर बोचरी टीका केली.
सूर बदले बदले है जनाब के… राजकारणातील अलका कुबल यांना हे पाहून पुन्हा अंधारात अश्रू अनावर होतील…
लवंडे जोमात, मातोश्री कोमात…, अशा शब्दात मनसेने संजय राऊतांच्या टीकेचा समाचार घेतला.

Web Title :-  MNS | gajanan kale has responded to sanjay rauts criticism of mns president raj thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update