मनसेने पालिकेतील इंग्रजी पाट्यांना काळे फासले

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कामकाजात मराठी भाषेचा वापर करावा तसेच प्रत्येक कार्यालयाच्या बाहेर अधिकाऱ्यांची नावे ही मराठीत असावी यासाठी आज (सोमवार) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी पालिकेच्या चौथ्या मजल्यावरील  इंग्रजी पाट्यांवर शाई फेकत काळे फासले.

आज पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या चौथ्या मजल्यावर मराठी अस्मितेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने इंग्रजी पाट्यांवर शाई फेकत काळे फासले, मराठी आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची अशा प्रकारच्या घोषणा देत,चौथ्या मजल्यावरील इंग्रजी पाट्यांनावर शाई फेकली, महापालिकेच्या प्रशासनाने लवकरात लवकर इंग्रजी पाट्या बदलून मराठी कराव्यात अन्यथा या पेक्षाही उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला आहे. मनसेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टेकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष सचिन चिखले, रुपेश पटेकर,राजू सावळे,बाळा दानवले,अंकुश तापकीर,हेमंत डांगे,मयूर चिंचवडे,सीमा बेलापूरकर,अश्विनी बांगर,सुशांत साळवी,विशाल मानकरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.