भाजप सोबत जाण्यासाठी ‘मनसे’ला घ्यावा लागेल ‘हा’ मोठा निर्णय

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राजकीय चर्चा केली. त्यामुळे मनसे भाजप सोबत जाणार अशी चर्चा सुरु झाली. मात्र मनसेला जर भाजप सोबत यायचे असेल तर एक मोठा निर्णय घ्यावा लागेल असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात अनेक राजकीय बदल पाहायला मिळाले. यामध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत राजकीय चर्चा केली. मनसे भाजपा सोबत जाणार अशी चर्चा सुरु झाल्या. याबाबत पाटील यांना विचारले असता राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली असून पुढे काहीच हालचाली झाल्या नसल्याचे त्यांनी सांगितले.

तर मनसेला भाजप सोबत यायचे असेल त्यांना ‘अमराठी आणि परप्रांतीय’ हा मुद्दा बाजूला करावा लागेल. ८० टक्के स्थानिकांना नोकरीत प्राधान्य दिल्यानंतर २० टक्के जागा अमराठी ना देण्यात हरकत नाही. बाहेरच्या राज्यातुन पोटासाठी आलेली लोक काय बांगलादेश, पाकिस्तान मधील आहेत का ? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. तसेच अद्याप राज ठाकरे यांच्या कडून कोणताच पुढील प्रस्ताव आला नसल्याचे सांगितले.

दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला भेटत असत आणि त्यानंतर मुंबईचे कमिशनर ठरत असे या संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समारोप घेतला. राऊत यांच्या त्या वक्तव्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/