विचार महाराष्ट्र धर्माचा, निर्धार हिंदवी स्वराज्याचा ; ‘मनसे’च्या आमंत्रणातून हिंदुत्ववादाची ‘हाक’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यवापी अधिवेशन 23 जानेवारी 2020 ला होणार आहे. त्यासाठीचे मनसेकडून कार्यकर्त्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. या अधिवेशनात मनसे हिंदुत्वाची कास पकडणार असे दिसून येत आहे. विचार महाराष्ट्र धर्माचा, निर्धार हिंदवी स्वराज्याचा असे या पोस्टरवर देण्यात आले आहे. यातून मनसे-भाजप युती तर होणार नाही ना याची राजकीय चर्चा रंगली आहे.

या अधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे नक्की काय भूमिका घेतात याकडे पहावे लागेल. मराठी माणसाचा मुद्दा आधिक व्याप्त करत आता मनसे हिंदुत्ववाद पुढे आणत आहे असे सध्या तरी काही मनसेच्या दिवसांच्या घडमोडींवरुन समोर येत आहे.

मनसेकडून पोस्टरबाजी –
आज दादरमध्ये शिवसेना भवनाबाहेर मनसेकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. ‘सत्तेसाठी सतराशे साठ, महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट’ असा एक प्रकारचा खोचक टोलाच या पोस्टरवर लिहिला गेला आहे. विशेष म्हणजे मनसेचा हा पोस्टर भगव्या रंगात आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे पुन्हा एकदा मनसे भाजपसोबत युतीच्या चर्चांना उधाण आले आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची येत्या 23 जानेवारीला जयंती आहे. याच निमित्ताने मुंबईत मनसेचे अधिवेशन होणार आहे. त्यापूर्वी मनसेने मुंबईत वातावरण निर्मितीसाठी पोस्टरबाजी सुरु केली आहे. या पोस्टरवर आणखी विशेष म्हणजे यात राज ठाकरेंचा उल्लेख ‘महाराष्ट्र धर्म सम्राट’ असा करण्यात आला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like