MNS | जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने खोटे शिक्के तयार केले आणि बानवट सही केली; मनसेच्या महिला जिल्हाध्यक्षांवर गुन्हा

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) पक्षाच्या पनवेल आणि उरण तालुका महिला आघाडी जिल्हाध्यक्षा आदिती सोनार (Aditi Sonar) यांनी एक अजब गुन्हा केला आहे. सोनार यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट सहीचा आणि शिक्क्यांचा वापर करून अवैध बांधकाम केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांच्यावर खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात पनवेल तहसील कार्यालयातर्फे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (MNS)

आदिती सोनार यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या केल्या. तसेच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा बनावट शिक्का तयार केला. त्यांच्या वापरातून त्यांनी अवैध बांधकामांना परवानगी दिली आणि ती पूर्ण केली. याबाबत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. खांदेश्वर पोलिसांनी त्यांच्यावर फसवणूक आणि इतर गुन्हे दाखल केले आहेत. पोलीसांना प्राप्त माहितीनुसार, आदिती सोनार यांनी काही दिवसांपूर्वी पनवेलच्या विहीघर परिसरातील शेतजमिनीवर बांधकाम केले होते. यासाठी त्यांनी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या खोट्या सहीचा आणि शिक्यांचा वापर केला होता. तसेच याशिवाय त्यांनी शेतजमीन बिगरशेती असल्याचे देखील भासवले होते. (MNS)

यासंदर्भात रायगड जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार प्राप्त झाली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी केली असता,
आदिती सोनार यांनी बनावट सही आणि शिक्क्यांचा वापर केल्याचे उघड झाले.
याप्रकरणी रायगडच्या खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे प्रकरण उघड होताच परिसरात खळबळ उडाली आहे.
अदिती सोनार यांनी वर्षभरापूर्वी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला होता.
मनसे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Web Title :- MNS | khandeshwar police register fir against mns aditi sonar over forged stamps in the name of collector

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amruta Subhash | अमृता सुभाषने बॉलिवूडमधील टाइपकास्ट वर केलेले ‘ते’ वक्त्यव्य चर्चेत; “ओटीटीमुळे बऱ्याच गोष्टी बदलल्या…”

IPL 2023 | राजस्थान रॉयल्सने अब्दुल बसिथसाठी खर्च केले 20 लाख; कोण आहे अब्दुल बसिथ?

Aurangabad Crime | पत्नीच्या गर्भपातासाठी पतीचे धक्कादायक कृत्य; फुलंब्री मधील प्रकार