MNS Leader Bala Nandgaonkar | बाळा नांदगावकरांचा इशारा; म्हणाले – ‘राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MNS Leader Bala Nandgaonkar | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांंनी मशिदींवरील भोंग्याबाबत मोठी भूमिका घेतली आहे. त्यानंतर राज्यात गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, आता राज ठाकरे आणि मनसे नेते बाळा नांदगावकर (MNS Leader Bala Nandgaonkar) यांना अज्ञाताकडून धमकीचे पत्र आल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील (Dilip Walse-Patil) व मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

 

”राज ठाकरे यांच्या केसालाही धक्का लागला तरी महाराष्ट्र पेटेल,” असं बाळा नांदगावकर (MNS Leader Bala Nandgaonkar) यांनी म्हटलं आहे. त्यावेळी ते म्हणाले, ”बाळा नांदगावकरला धमकी आली, ते ठीक आहे. पण राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही, याची दखल राज्य सरकारने (Maharashtra State Government) घ्यावी. मी वारंवार राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबासाठी सुरक्षा मागत आहे. राज्य सरकार दखल घेत नाही, किमान केंद्र सरकारने (Central Government) तरी दखल घ्यावी,” अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

 

दरम्यान, राज ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांना निनावी पत्राच्या माध्यमातून धमकी देण्यात आली आहे.
अजानबाबत जे करत आहात ते बंद करा, नाहीतर तुम्हाला ठार करु.
तुम्हाला तर सोडणार नाहीच पण राज ठाकरेंनाही मारुन टाकू, असं त्या पत्रातून म्हटलं आहे.
या पत्रानंतर आता मनसे सैनिकांकडून कठोर प्रतिक्रिया उमटताना दिसत असले तरी, यानंतर मनसेची काय भूमिका असणार हे पाहावे लागेल.

 

Web Title :- MNS Leader Bala Nandgaonkar | mns chief raj thackeray and bala nandgaonkar get threat letters

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा