राजकारण फार काळ टिकत नाही, ‘बहु भी कभी सास बनती है’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कोहिनूर मिल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहेत. खबरदारी म्हणून ईडीच्या कार्यालयाबाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी मनसेचे पदाधिकारी आणि २०० हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. यावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकारण फार काळ टिकत नाही, बहु भी कभी सास बनती है’ असे वक्तव्य मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना केले आहे.

बाळा नांदगावकर राज यांचे निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजवर दाखल झाले आहेत. या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच ईडीच्या कार्यालयाबाहेरही पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मनसे कार्यकर्ते आक्रमक होऊन आंदोलन करण्याची शक्यता असल्यानं खबरदारी म्हणून पोलिसांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच धरपकड सुरू केली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे, संतोष धुरी, ठाणे शहर अध्यक्ष रवी मोरे, ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आदी नेत्यांसह दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

आरोग्यविषयक वृत्त –