ठाकरे कुटुंबातील व्यक्तीवर पूर्ण ‘विश्वास’, ‘मनसे’कडून आदित्य यांची ‘पाठराखण’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर विरोधकांकडून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तर भाजपचे नेते नारायण राणे यांनी उघडपणे टीका केली आहे. मात्र, या प्रकरणावर मनसेने आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

ठाकरे परिवारातील एखाद्या सदस्याकडून अशाप्रकारची गोष्ट झाली असेल, असे वाटत नाही. भाजपच्या आरोपांमुळे हा वाद सुरु झाला. असे मत बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आदित्य ठाकरे यांना मनसेचे समर्थन असल्याचे स्पष्टपणे उघड झाले आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरे यांच्या केलेल्या आरोपांना उत्तर दिले आहे.

सुशांत प्रकरणात आदित्य ठाकरेंचं नाव कुठेही आलेलं नाही, मीडिया नाव घेतेय, मोठा व्यक्तीचं नाव घेतलं की, कोणत्याही प्रकरणाला प्रसिद्धी मिळते. मोठ्या कुटुंबातील व्यक्तींची नाव घेवून सनसनाटी निर्माण केली जाते. तांत्रिक दृष्ट्या हा तपास सीबीआयकडे दाखल केला आहे. तो बेकायदेशीर आहे. त्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले असल्याचे सांगितले. कायदा आणि व्यवस्था हा महाराष्ट्राचा विषय आहे. शिवसेना कोणाच्या दबावाला बळी पडणार नाही असेही खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.