MNS Leader Bala Nandgaonkar | राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार ! ‘साहेबांचा शिवसैनिक आणि मनसेचा महाराष्ट्र सैनिक यात काहीही फरक नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MNS Leader Bala Nandgaonkar | राज ठाकरे (Raj Thackeray) हे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे खरे वारसदार आहेत. बाळासाहेबांच्या अंगाखांद्यावर ते वाढले आहेत. बाळासाहेबांची सगळी भूमिका राज ठाकरे यांना माहिती आहे. आणि तोच विचार राज ठाकरे महाराष्ट्र सैनिकांना देत आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक (Shiv Sainik) आणि राज ठाकरे यांचा महाराष्ट्र सैनिक (Maharashtra Sainik) यांच्यात काहीही फरक नाही, असे वक्तव्य मनसे नेते बाळा नांदगावकर (MNS Leader Bala Nandgaonkar) यांनी केले आहे.

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) यांची सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी घेतलेली मुलाखत चांगलीच चर्चेत आली आहे. मी आजारी असताना डाव साधला, असा आरोप ठाकरे यांनी मुलाखतीत केला होता. ज्या आईने राजकारणात जन्म दिला तिलाच गिळायला निघालेली ही औलाद आहे, यांनी स्वत: च्या आई – वडिलांचे फोटो लावावेत आणि निष्ठा व्यक्त करावी आणि मते मागावीत, असा घणाघात ठाकरे यांनी केला होता. हे आरोप शिंदे गटापेक्षा (Shinde Group) मनसेच्या जास्त जिव्हारी लागल्याचे दिसत आहे.

 

या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली आहे. भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे (BJP Union Minister Narayan Rane) यांच्यानंतर आता मनसे नेते बाळा नांदगावकर (MNS Leader Bala Nandgaonkar) यांनीही या मुलाखतीवरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटले की, बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना जन्म दिला. पण आमच्यासारखे लाखो, करोडो कार्यकर्ते आहेत ज्यांना कर्माने बाळासाहेबांनी जन्म दिला. आमचा अधिकार त्यांच्याहून जास्त आहे. कर्माने बाळासाहेबांनी आम्हाला मोठे केले. बाळासाहेब एक विचार, एक संस्कार आणि आम्हाला पुढे घेऊन जाणारे मार्गदर्शक नेतृत्व होते. बाळासाहेब संस्था आहेत त्यावर आमचाही अधिकार आहे.

 

बाळा नांदगावकर म्हणाले, राज ठाकरे स्पष्ट आणि परखड बोलतात. त्यांच्या पोटात तेच ओठावर येते.
राज ठाकरे यांनी मुलाखतीत त्यांची भूमिका ठामपणे मांडली. राज यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे लोकांना त्यांच्या मनाचा ठाव घेता येतो.
राज ठाकरे यांनी केलेले विधान नेहमी चर्चेत राहते. तुम्हाला काय हवे हे राज ठाकरेंना बरोबर माहिती असते.
प्रत्येकाला आपापला अधिकार आहे. पक्ष पुढे कसा न्यायचा. आम्ही आमची भूमिका पुढे घेऊन चाललो आहोत.

 

दरम्यान, भाजपा आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांना सवाल केला आहे की,
आपण छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj),
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Punyashlok Ahilya Devi Holkar), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar)
यांना दैवत मानतो जर त्यांच्या कुटुंबाने सांगितले महाराजांचा फोटो लावू नका, आंबेडकरांचे फोटो लावू नका.
मग त्या – त्या महापुरुषाला तुम्ही लहान करत नाही का ? हे उद्धव ठाकरेंना कळलेले नाही.
बाळासाहेब कुणा एकाची मक्तेदारी नाही.
स्मारक का बांधताय ? ज्योत का पेटवली आहे ? राज्यातील जनता तिथे नतमस्तक होते.
शिवसेनाप्रमुखांना किती लहान करणार आहात ?

 

Web Title :- MNS Leader Bala Nandgaonkar | there is no difference between balasahebs shiv sainik and raj thackerays maharashtra sainik says mns leader bala nandgaonkar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा