मनसे नेत्याने राष्ट्रवादीच्या युवक अध्यक्षाच्या डोक्यात घातला दगड

अंबरनाथ : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेतील मनसेच्या पराभूत उमेदवाराने राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अंबरनाथ विधानसभा युवक अध्यक्षाला मारहाण केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे. सुमेध भवार असे मारहाण करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्याचे नाव आहे. सुमेध भवार याने राष्ट्रवादीच्या अंबरनाथ विधानसभा युवक अध्यक्ष सचिन अहिरेकर यांना मारहाण करत डोक्यात दगड घातल्याची माहिती आहे.

शनिवारी सायंकाळी अंबरनाथच्या कल्पना हॉटेलच्या बाहेर राष्ट्रवादीच्या सचिन अहिरेकर यांना मनसेचा नेता सुमेध भवार आणि त्याच्या सुरक्षा रक्षकांनी मारहाण केली. यावेळी हिरेकर यांच्या डोक्यात दगड घातल्याची माहिती असून यामध्ये अहिरेकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी मनसे नेता सुमेध भवार यांनी सचिन अहिरेकरवर उलट आरोप केला आहे. सचिन याने आपल्याला फोन करून शिवीगाळ केली. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. तो जेव्हा मला भेटला तेव्हा तो दारू पिऊन आला होता. माझ्यासोबत वाद घालत असताना तो स्वत:च पडला आणि डोक्याला जखम झाली असल्याचे सुमेध भवार यांनी सांगितले.

याप्रकरणी सचिन अहिरेकर यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात सुमेध भवार आणि त्याच्या सुरक्षा रक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविकास आघाडीत गृहमंत्री असताना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर असा हल्ला झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीचे पदाधिकारी गृहमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like