‘शुभ मंगल सावधान’ म्हणत मनसेच्या ‘या’ नेत्याचे सत्तास्थापनेवरुन ‘सूचक’ विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील राजकारणाला अखेर वळण मिळताना दिसत आहे. भाजप बरोबर शिवसेनेचे बिनसल्यावर महाशिवआघाडी सत्तास्थापनेच्या दिशेने कूच करत आहे. तिन्ही पक्षांची विचारधारा वेगळे असलेले पक्ष राज्यात सरकार स्थापन करणार आहे. परंतू आता मनसेने शिवसेनेला टोला लावला आहे. मनसे नेते संदिप देशपांडे यांनी नुकतेच एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणाले की हल्ली आपले गुण जुळतात की नाही हे न पाहता लग्न जमवतात, त्यांच्यासाठी शुभ मंगल सावधान.

राज्यात लवकरच महाशिवआघाडी सरकार स्थापन करेल अशी शक्यता वाढली आहे. राजकीय हलचालींना वेग आला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दिल्लीत बैठका सुरु आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देखील शिवसेनेला पाठिंबा देण्यास अनुमती दिल्याचे कळते आहे. आता या पक्षात सत्तास्थापनेवरुन काही बाबीवर चर्चा शिल्लक असल्याचे कळते आहे. परंतू चर्चांच्या घुराळामुळे सत्तास्थापनेला उशीर होत आहे.

राज्यात सत्तास्थापनेस उशीर होत असल्याने राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू केली. परंतू त्यानंतर महाशिवआघाडीत चर्चेचे घुराळ सुरु झाले आणि सत्तास्थापनेच्या दिशेने कूच करत असल्याचे दिसू लागले. असे असले तरी दरम्यान शरद पवारांनी पंतप्रधान मोदींची देखील भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले. आता सांगण्यात येत आहे की सोनिया गांधींनी शिवसेनेला पाठिंबा देण्यास सहमती दर्शवली आहे. आता सरकार कधी स्थापन होणार हे देखील पुढील राजकीय घडमोडींवरच ठरेल.

राज्यात सत्तास्थापनेसाठी सध्या तिन्ही पक्षात चर्चा सुरु आहेत. तिन्ही पक्षांचे किमान समान कार्यक्रमावर एकमत झाले आहे. तर सत्तावाटपात शिवसेनेला संपूर्ण पाच वर्षी मुख्यमंत्रिपद मिळेल. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद देण्यात येईल असे महाशिवआघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. यात शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह 14 मंत्रिपदे, राष्ट्रवादीला 14 तर काँग्रेसला 12 अशी मंत्रिपदे देण्यात येतील असे सांगण्यात येत आहे.

Visit :  Policenama.com