MNS Leader Sandeep Deshpande | किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप, मनसेचे संदीप देशपांडे म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MNS Leader Sandeep Deshpande | मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांची दादर पोलीस ठाण्यात (Dadar Police Station) चौकशी करण्यात आली आहे. त्यांच्यावर एसआरए प्रकल्पात सदनिका हडपल्याचे (SRA Scam) आरोप आहेत. त्यांच्यावरील आरोप पेडणेकर यांनी फेटाळले आहेत. त्यावर आता मनसेच्या संदीप देशपांडे  यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

यादव नगर, चिमदास विठ्ठलदास पत्राचाळ, शंकर नगर, नरमपथ मार्ग येथील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात आर्थिक
फसवणूक झाली आहे. येथील 195 क्रमांकाच्या भूखंडावर केवळ 63 झोपड्या होत्या. पण वसाहत अधिकारी आणि या योजनेते मुख्य प्रवर्तक असलेल्या शिवसेना (Shivsena) पदाधिकारी बेलेकर यांच्यासह अन्य काही नेत्यांनी मिळून या 63 झोपड्यांच्या जागी 221 झोपड्यांची नोंद केली. या प्रकारातून मोठी रक्कम उभी झाली आणि ती संबंधितांनी लाटली. या झोपड्यापैकी एक झोपडी वसाहत अधिकारी चंदू चव्हाण (Chandu Chavan) यांच्या नावावर आहे. त्यांनी खोटे प्रतिज्ञपत्र दाखल केले आहे. त्यांचे दादरमध्ये मोठे हॉटेल देखील आहे. हा सर्व प्रकार घडला, त्यावेळी त्या भागाच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर होत्या. त्यामुळे वसाहत अधिकाऱ्याला अटक करण्यात आल्यानंतर त्याच्या पाठिशी कोणाचा हात होता, या सर्व प्रकारात कोण कोण साथिदार आहेत, या प्रश्नाचे उत्तर किशोरी पेडणेकर यांनी द्यायला हवे, असे संदीप देशपांडे (MNS Leader Sandeep Deshpande) म्हणाले.

Web Title :- MNS Leader Sandeep Deshpande | Serious allegations against Kishori Pednekar, Sandeep Deshpande of MNS said…

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | 35 हजारांचे घेतले दीड लाख रूपये; शेकडा 10 टक्क्यांनी उकळले व्याज, आरोपीला अटक

Sushma Andhare | विमा कंपन्या मनमानी करत असून देखील राज्य सरकार चकार शब्द काढत नाही – सुषमा अंधारे