MNS Leader Vasant More | ‘… तेव्हाच माझ्या पोटात गोळा आला होता’ भावाच्या आत्महत्येनंतर वसंत मोरेंची फेसबुकवर भावनिक पोस्ट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील मनसेचे नेते आणि माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (MNS Leader Vasant More) यांचे चुलत बंधू (Cousin) रविंद्र गणपत मोरे (Ravindra Ganpat More) यांचे सोमवारी निधन (Passed Away) झाले. रविंद्र मोरे यांनी आत्महत्या (Suicide) करत आपलं जीवन संपवलं. भावाच्या निधनानंतर वसंत मोरे (MNS Leader Vasant More) यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी फेसबुकवर भावनिक पोस्ट (Emotional Post) लिहून रविंद्र मोरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले की, मला जेव्हा काल सकाळी तुझ्या पोराने तात्या शेतावर काहीतरी झालंय असं सांगितलं. तेव्हाच माझ्या पोटात गोळा आला होता. मी गाडीतील मित्रांना बोललो देखील होतो की मला काहीतरी सांगायचं होतं, पण गर्दीमुळे आणि प्रेसमुळे तो कदाचित बोलला नसेल. तो सारा अंदाज तुझी चिठ्ठी मिळताच पहिल्या वाक्यातच आला आणि नक्की कोण चुकलं तेच कळेना, अशी हतबलता वसंत मोरे (MNS Leader Vasant More) यांनी व्यक्त केली.

 

रविंद्र मोरे यांनी कौटुंबिक कारणांमुळे आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचं त्यांच्या सुसाईड नोटमधून स्पष्ट झालं आहे. शेवटच्या शणी आपल्या भावाला मदत करु न शकल्याचं शल्य वसंत मोरे यांनी सोशल मीडियावरील (Social Media) पोस्टमध्ये मांडलं आहे. ते तुझं वाक्य… तात्या मला माफ कर लय बोलायचं होते रे, पण काय करु बोलता येत नाय.. बाकी खाली लिहलेले तुझे प्रॉब्लेम खूप किरकोळ होते रे, जो तात्या रोज हजारो लोकांचे प्रश्न चुटकीसरशी सोडवतो त्याने तुझे प्रश्न नसते का रे सोडवले रवी ? अरे रोज आपल्या ऑफिसच्या दारातील गर्दीतून रस्ता काढत जात होतास ना? मग मी तुला त्याही गर्दीत रस्ता दाखवला नसता का रे रवी? असं मोरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, आत्महत्या हा कधीच अडचणींवरील मार्ग होऊ शकत नाही. यातून जनतेने एक मात्र नक्की घ्यावे की आपण बोललं पाहिजे, असं आवाहनही वसंत मोरे यांनी केले आहे.

Web Title : MNS Leader Vasant More | mns leader vasant more brother passed away emotion fb post by vasant more

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त