MNS Leader Vasant More | वसंत मोरेंचं ठाण्यात भाषण; म्हणाले – ‘राज ठाकरेंची ब्लू प्रिंट पहायची असेल तर कात्रजला या’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – MNS Leader Vasant More | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पाडव्या दरम्यान बोलताना मशीदींवरील भोंग्यांविरोधात भूमिका मांडली होती. या भूमिकेला विरोध करणारे पुण्याचे मनसे नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे (MNS Leader Vasant More) यांनी आज मनसेच्या ठाण्यातील उत्तर सभेत (Thane Uttara Sabha) भाषण केले आहे. यावेळी राज ठाकरेंची ब्लू प्रिंट पहायची असेल तर कात्रजला (Katraj) या, असं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.

 

त्यावेळी बोलताना वसंत मोरे (MNS Leader Vasant More) म्हणाले, ”राज ठाकरेंची गेल्या 3 महिन्यापासून तब्येत बिघडलेली आहे. साहेबांना त्रास होतोय हे मी काल पाहिले. त्यांना एकेक पायरी चढण्यासाठी त्रास होत होता. ब्लू प्रिंट साहेबांनी आणली, पुण्यात मनसेचे आम्ही दोनच नगरसेवक आहोत. ती ब्लू प्रिंट कशी राबविली हे कात्रजमध्ये येऊन पहा. शंभरावर नगरसेवकांना जे जमले नाही ते आम्ही दोघांनी केले. पालिकेचा पुरस्कारही मनसेच्या नगरसेवकाला मिळाला.” असं ते म्हणाले.

 

पुढे वसंत मोरे म्हणाले, ”पुण्यात मनसेने काम केले. गोरगरीबांना फायनान्स, बँका वाल्यांनी त्रास देण्यास सुरुवात केली.
अशावेळी मनसेची दारे उघडी होती. लोकांना फायनान्स वाला, बँकेवाला दारात आला की मनसे वाला आठवतो.
जेव्हा निवडणुका लागतात तेव्हा मनसेवाला कुठे जातो, तेव्हा का नाही मनसेवाला आठवत,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, ”सोळा वर्षांमध्ये सोळा गार्डन करणारा मी एकमेव नगरसेवक मला पुरस्कार देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) होत्या.
पाटील म्हणाले, तुम्ही भाजपात या, नगरसेवक व्हाल, तेव्हा मी त्यांना उत्तर दिले,
मी गेली पंधरा वर्षे भाजपाच्याच नगरसेवकांना पाडून नगरसेवक होतोय,” असं देखील त्यांनी सांगितलं आहे.

 

 

Web Title :-  MNS Leader Vasant More | MNS vasant more full speech in thane if you want to see raj thackerays blueprint come to katraj punes mns leader vasant more speech in thane uttar sabha

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा