MNS Leader Vasant More | “जिथे फुले वेचली तिथे काटे …”; वसंत मोरेंचा शहर कार्यालयात येण्यास नकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि मनसे नेते वसंत मोरे (MNS Leader Vasant More) पुन्हा एकदा आपल्या पक्षावर नाराज असल्याची चर्चा अनेक दिवस सुरू आहे. वसंत मोरेंनी नुकतीच राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांची पुण्यात भेट घेतली. ‘अमित ठाकरेंनी मला माझी बाजू मांडण्यासाठी बोलावलं होतं,’ अशी माहिती वसंत मोरे (MNS Leader Vasant More) यांनी दिली आहे. यावेळी त्यांच्या नाराजीसाठी पुणे शहर कार्यालय जबाबदार असल्याचे सांगितले. शिवाय या बैठकीसाठी मी स्मशानभूमीत येईल, पण मनसेच्या शहर कार्यालयात जाणार नाही, असेही त्यांनी ठणकावले.

वसंत मोरे (MNS Leader Vasant More) कोअर कमिटीच्या बैठकीला अनुपस्थित होते. यासंबंधी त्यांना विचारणा केली असता ते म्हणाले, “हा माझ्या स्वाभिमानाचा विषय नाही. माझा स्वाभिमान इतक्या सहजासहजी दुखावला जात नाही. कोअर कमिटीने जर एखाद्या स्मशानभूमीत बैठक घेतली तरी मी तिथेही जाईल, पण शहर कार्यालयात जाणार नाही. जिथे फुले वेचली तिथे काटे वेचायला जाणार नाही”. त्यांना याचे कारण विचारल्यावर ते म्हणाले “मी तिथे अनेक स्वप्नं पाहिली होती. महानगरपालिका जिंकल्यानंतर गुलाल उधळण्याचे, नगरसेवक निवडून आल्यानंतर पेढे वाटण्याचे स्वप्न पाहिले होते. पण माझे शहराध्यक्ष पद गेल्यानंतर तिथे गुलाल उधळण्यात आला, पेढे वाटण्यात आले. त्यामुळे मी आता त्या पक्ष कार्यलयात जाणार नाही”.

पुढे शहर कार्यालयात बैठक घेण्याचा अट्टहास का, असा प्रश्न करत वसंत मोरे म्हणाले, “ जेव्हा शहर कार्यालय नव्हते, तेव्हा कोअर कमिटीचा एक सदस्य परिसरातील एखाद्या हॉटेलमध्ये बैठक घेण्याची जबाबदारी पार पडायचा. मग आताच जागेचा हट्ट का केला जात आहे. याआधी शहर कार्यालयात बैठका होत नव्हत्या.
शेवटी ते पण अडवणूक करत आहेत. मी कोणाला भारत-पाकिस्तान सीमेवर चर्चेसाठी बोलवत नाही.
एखाद्या शाखाध्यक्षाच्या घरी घेतली तरी मला चालेल. पण जिथे माझ्याविरोधात कारस्थानं झाली तिथे जाऊ वाटत नाही”.

“मनसेमध्ये एकत्रित बसवून वाद मिटवायची इच्छा दिसत नाही. माझं एकत्रित कुटुंब आहे.
आम्हा भावांमध्ये आजही वाद होतात, पण आम्ही सगळे एकत्र बसून तो वाद मिटवतो.
पण, इथे तसं होताना दिसत नाही,” अशी खंत वसंत मोरेंनी व्यक्त केली.
पुढे त्यांच्या पक्ष सोडून जाण्याच्या चर्चेवरही त्यांनी टिप्पणी केली.
“मी माझी कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही, राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने फेसबुकवर क्लिप टाकली होती.
त्यानंतर मी सर्वकाही स्पष्ट केलं होतं. मला जर जायचं असतं तर मी कधीच गेलो असतो.
मी पक्ष सोडणार आहे, असं सांगितलेलं नाही.
इतर पक्षातील लोक जर मला त्यांच्या पक्षात घेण्यास इच्छुक असतील तर यात माझी चूक नाही,”
असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना पुन्हा पूर्णविराम दिला.

Web Title :- MNS Leader Vasant More | mns vasant more says will not go to city office of party after meeting with amit thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Inter Caste Marriage | आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना आता पोलीस पुरवणार सुरक्षा

SSC HSC Board Exams | दहावी, बारावीच्या परीक्षार्थींनो सावधान; बोर्डाने बदलले हे दोन नियम