MNS Leader Vasant More | पुणे मनसेत पुन्हा वाद? कसब्यातील बॅनरवरुन वसंत मोरेंची टोकाची भूमिका, म्हणाले-‘…तर मला ठाम भूमिका घ्यावी लागेल’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे नेते वसंत मोरे (MNS Leader Vasant More) यांच्या नाराजीची सध्या पुण्यात जोरदार चर्चा सुरु आहे. यापूर्वी देखील वसंत मोरे यांनी पक्षांतर्गत होणाऱ्या राजकारणाची थेट पक्ष प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर मोरे यांची नाराजी दूर करण्यात आल्याने मोरे पुन्हा पक्षामध्ये सक्रिय झाले होते. परंतु आता कसब्यात लावण्यात आलेल्या एका बॅनरवरुन वसंत मोरे नाराज झाले आहेत. त्यामुळे पुणे मनसे गटात नव्या वादाला तोंड फुडण्याची शक्यता आहे. कसब्यात मनसेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मोरेंना (MNS Leader Vasant More) डवलल्याने त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

नेमकं काय घडलं?

पुण्यातील कसबा पेठ (Kasbah Peth) भागात मनसेकडून रामनवमी (Ram Navami) निमित्त महाआरतीचे आयोजन करण्यात आले. यासाठी जय्यत तयारी करण्यात आली. परंतु, या आरतीसाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर मनसे सरचिटणीस वसंत मोरे यांचे नाव किंवा फोटो देखील छापण्यात आलेला नाही. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

… तर मग माझं नाव का नाही?

कसब्यात जो बॅनर लावण्यात आला आहे, त्यामध्ये शहर मनसेच्या कोअर कमिटीमधील (Pune MNS) 11 पैकी 9 जणांची नावे आहेत. मला यात विशेष याचं गोष्टीचं वाटलं की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (Rashtriya Swayamsevak Sangha) कसब्यातील कार्यकर्ते प्रशांत यादव यांच्या उपस्थितीत ही आरती होणार आहे. बॅनरवर त्यांचं नाव टाकलं आहे. RSS च्या कर्यकर्त्यांचं मनसेच्या बॅनरवर नाव आहे, मग मनसेचा सरचिटणीस असलेल्या वसंत मोरेचं नाव त्यावर का नाही?, असा सवाल वसंत मोरे यांनी केला आहे.

हे जाणूनबुजून केलं जात आहे

वसंत मोरे यांनी हे जाणूनबुजून केलं जात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. याबाबत वरिष्ठांशी बोलणं झालं असल्याचे मोरे यांनी सांगितले.
मला तरी वाटतं की हे जाणून-बुजून केलं जात आहे. कुठेतरी वाद निर्माण करायचा.
माझं नाव टाकायचं नाही. एखाद्याला वाटतं की आपण सूर्यावर झाकण टाकू.
झाकल्यानं कोंबडं आरवायचं राहातं का? दिवस उगवतोच ना? असं होत नसतं.
त्यांना या गोष्टी समजायला हव्यात. वारंवार हे वाद घालायचे आणि काहीतरी वेगळा चर्चा घडवून आणायची हे सगळं षडयंत्र आहे, असं वसंत मोरे म्हणाले.

ठाम भूमिका घ्यावी लागेल

वसंत मोरे पुढे म्हणाले, यांना बरेच दिवस काही नसेल तर या गोष्टी लागतात. पण मलाही या गोष्टीचा राग येतोय.
जर या लोकांना एवढा माझा त्रास होत असेल, तर मलाही काहीतरी ठाम भूमिका घ्यावी लागेल.
राज ठाकरेंशी मला या गोष्टी बोलाव्या लागतील. एकतर यांना जाब विचारा अथवा मला तरी सांगा की मी काय करु आता,
अशी टोकाची भूमिका वसंत मोरे यांनी घेतली आहे.

Web Title :-  MNS Leader Vasant More | mns vasant more slams party kasba peth wing for banner controversy

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | जुन्या कात्रज घाट रोडवरील हॉटेल तोरणाजवळ युवकाच्या खुनाचा प्रयत्न

Uddhav Thackeray | राम नवमीच्या दिवशी उद्धव ठकरेंचा शिंदे गटाला टोला, म्हणाले-‘सध्या राजकारणात
श्रीरामाचे नाव घेऊन दगड…’