MNS | मनसेची आणखी एक मोठी घोषणा ! अक्षय्य तृतीयेला लाऊडस्पीकर…

0
165
MNS | maharashtra-navnirman-sena-(MNS)-workers-will-perform-maha-aarti-at-their-local-temples-across-the-state-on-may-3-on-the-occasion-of-akshaya-tritiya

मुंबई – पोलीसनामा ऑनलाइन – MNS | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे (Loudspeaker On Mosque) उतरवण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतलेला पाहायला मिळत आहे. राज ठाकरेंनी राज्य सरकारला 3 मेपर्यंतच्या दिलेल्या अल्टिमेटमची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यासोबतच राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत 1 मेला औरंगाबादमध्ये (Aurangabad) सभा घेणार असल्याचं तर 5 जूनला अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावर जाण्याची घोषणा केली होती. मात्र अशातच MNS कडून आणखी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे.

 

मनसेचे नेते 3 मेला अक्षय तृतीयाच्या (Akshay Tritiya) मुहूर्तावर राज्यभरात त्यांच्या स्थानिक मंदिरांंमध्ये महाआरती करतील. लाऊडस्पीकरचा वापर करून ही ‘महाआरती’ (Mahaarati) केली जाईल, अशी माहिती मनसे नेते नितीन सरदेसाई (Nitin Sardesai) यांनी दिली आहे. मनसेच्या नव्या घोषणेमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. (MNS)

 

3 मे दिवशी रमजान ईद (Ramadan Eid) आहे आणि त्याच दिवशी मनसेने महाआरतीचं आयोजन केलं आहे. आधीच मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी मसनेकडून राज्य सरकारला 3 तारखेचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकार कशा प्रकारे पाऊलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

दरम्यान, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांनी धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई

करणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे 1 मेनंतर राज्यातील वातावरण बिघडण्याची शक्यता असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

 

 

Achalpur Violence Case | अचलपूर हिंसाचार प्रकरणात भाजप शहराध्यक्ष अभय माथनेला पुण्यातून अटक

Pune Crime | पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना ! मानलेल्या मामानं दाखवलं ‘काम’, 14 वर्षाच्या मुलीवर बलात्कार

BSNL Best Recharge Plan | बीएसएनएलचा बेस्ट प्लॅन ! 797 रुपयांत SMS, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगसह अनेक सुविधा

ST Workers Strike | एसटी कामगार कामावर हजर होण्यास सुरुवात; एका दिवसांत 15,185 कामगार परतले

Maharashtra Municipal Council-Corporation Senior Officers Transfer | राज्याच्या ‘नगरविकास’मधील 53 अधिकाऱ्यांच्या (मुख्याधिकारी / मनपा उपायुक्त) पदोन्नतीने बदल्या; जाणून घ्या नावे आणि नियुक्तीचे ठिकाण

Maharashtra Municipal Council Chief Officers Transfer | नगरविकास विभागाकडून बुलढाणा, अकोला, यवतमाळ, जळगाव आणि बीड जिल्ह्यातील ‘या’ 7 नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या (उचलबांगडी), जाणून घ्या नावे