home page top 1

विधानसभा 2019 : पुण्यात मनसेला ‘हा’ 1 मतदारसंघ मिळाला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील विधानसभेच्या आठ पैकी चार जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे. तीन जागा काँग्रेस लढवणार आहे. तर एक जागा मित्र पक्षाला सोडण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी आज स्पष्ट केले आहे. पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात सक्षम उमेदवार नसल्यामुळे आघाडीच्या कोट्यातून मनसेला जागा देण्याचा निर्णय झाला असल्याचे राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे.

दरम्यान, काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत मनसे सामील होणार की नाही यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. असे असतानाच पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदार संघ मनसेला सोडून मनसे आघाडीत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जवळपास निश्चित करण्यात आल्याचे यातून स्पष्ट होत आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मित्र पक्षाला जागा सोडल्याची घोषणा आज पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात केली.

अजित पवार म्हणाले, काही जागा मित्रपक्षांकडे असतील पण त्या राष्ट्रवादीच्या आहेत असे समजून त्या ठिकाणी काम करा. मतभेद बाजूला ठेवा, भांड्याला भांडे लागले की त्याचा आवाज किती येतो. आता शहाण्यासारखे वागा, सरकारने राज्याला कर्जबाजारी केले आहे. या पाच वर्षात अडीच लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. याआधी 54 वर्षात एवढे कर्ज होते, भाजपने पाच वर्षात तेवढे कर्ज केले. पुण्याचा पालकमंत्री असताना पाणी कमी असताना देखील पाणी कमी पडू दिले नाही. मात्र, आता धरणे भरली असताना देखील महिलांना पाण्यासाठी आंदोलने करावी लागत असल्याची स्थिती असल्याचा आरोप त्यांनी केला.

Visit :- policenama.com

Loading...
You might also like