MNS MLA Raju Patil | ‘आम्ही कोणाच्या दाढीला पक्ष बांधलेला नाही’; संपलेल्या पक्षाला मी उत्तर देत नाही म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना मनसेचं प्रत्युत्तर !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MNS MLA Raju Patil | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पाडव्याच्या भाषणात मशिदीवरील भोंगे असतील तिथे स्पीकर (Speaker) लावून हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) लावावी, या वक्तव्यावरून त्यांच्यावर सत्ताधारी पक्षामधील तिन्ही नेत्यांनी टीकास्त्र सोडलं होतं. शिवसेना भवनासमोर (Shiv Sena Bhavan) मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा लावली होती. या पार्श्वभूमीर बोलताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही मनसेवर खोचक टीका केली होती. आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) या टीकेला मनसे आमदार राजु पाटील (MNS MLA Raju Patil) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

 

मशिदीआदींवर भोंगे ‘आदी’ चालतात, पण हनुमान चालिसा ‘आदी’ चालत नाही ? प्रतिक्रिया’आदी’ गोष्टी विचाराअंती द्या. पक्ष ‘संपला’ आदी म्हणताय ?, आम्ही पक्ष जगवण्यासाठी कुणाच्या दाढीला बांधलेला नाही, असं म्हणत राजू पाटील यांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

 

राजू पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर देताना याबाबत ट्विट केलं आहे. राजू पाटील यांच्यावर प्रत्युत्तरावर आदित्य ठाकरे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं औत्सुकतेचं ठरणार आहे.

 

दरम्यान, आता पार पडलेल्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आमदारांसाठी घरे बांधून देण्याची घोषणा केली होती.
त्यावेळीसुद्धा सर्वात आधी घराची काही गरज नसल्याचं राजू पाटील म्हणाले होते. सर्वसान्यांनीही त्यांचं कौतुक केलं होतं.

 

Web Title :- MNS MLA Raju Patil | mns vs shiv sena we are not tied to anyones beard mns mla aditya thackeray replied

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा