MNS | नाशिकमध्ये मनसेला मोठे खिंडार! मनसेचे कार्यकर्ते होणार ‘या’ पक्षात सामील

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – एकेकाळी मनसेचा (MNS) बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक शहरातील शेकडो कार्यकर्ते शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. हे सर्व कार्यकर्ते आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’ वर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करतील. आमचे जेवढे कार्यकर्ते गेलेत, त्याहीपेक्षा मोठ्या संख्येने कार्यकर्ते हे आमच्या पक्षात समाविष्ट होत आहेत. असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. मात्र हा नाशिक शहरात मनसे (MNS) साठी मोठा धक्का असल्याचेही बोलले जात आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. नाशिकमध्ये मिळणाऱ्या या धक्क्यांमध्येच ठाकरे गटासाठी एक सुखद बातमी समोर आली आहे. नाशिक शहरात मनसेला मोठा धक्का ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे. मनसेचे (MNS) शेकडो कार्यकर्ते आज (दि.१६) मातोश्रीवर जाऊन ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

पुढील काही दिवसांमध्ये राज्यातील प्रमुख शहरांच्या महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहे.
त्याच पार्श्वभूमीवर विविध महापालिका क्षेत्रातील कार्यकर्ते हे वेगवेगळ्या पक्षात प्रवेश करत आहेत.

काही दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी तेथील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी-घाटी घेतल्या होत्या. मात्र ते मुंबई साठी रवाना होताच, ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
त्यानंतर नाशिकमध्ये ठाकरे गटात मोठी पोकळी निर्माण झाली होती.
त्यात आता मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने ही शिवसेनेच्या ठाकरे गटासाठी आनंदाची
बातमी असल्याचे बोलले जात आहे.
तसेच मनसेसाठी (MNS) हा फार मोठा धक्का असल्याची चर्चा नाशिकच्या राजकारणात सुरू झाली आहे.

Web Title :- MNS | mns activists from nashik will join the thackeray group

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Punit Balan Celebrity League (PBCL) | दुसरी ‘पुनित बालन सेलिब्रीटी लीग’ क्रिकेट स्पर्धा; पन्हाळा जॅग्वॉर्स संघाने विजेतेपद पटकावले

Gold Rate Today | सोन्याच्या दराचे रेकॉर्ड ब्रेक! सोन्याच्या दराचा आणखी एक नवा रेकॉर्ड, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे दर