MNS | राज ठाकरेंचेही टार्गेट बारामती! पुण्यातील कार्यक्रमात आगामी निवडणुकांसांठी पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या आणि पक्षप्रवेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – MNS | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) भाजपाने (BJP) आतापासून महाराष्ट्रातील बारामती सारख्या प्रमुख मतदार संघांची (Baramati Constituency) जबाबदारी देशपातळीवरील विविध नेत्यांवर दिली आहे. यासाठी दौरे देखील सुरू झाले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी नुकताच बारामती दौरा केला. आता मनसेसारख्या (MNS) प्रादेशिक पक्षाने देखील लोकसभेसाठी बारामती गड जिंकण्याचे टार्गेट ठेवल्याचे दिसत आहे.

 

कारण आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) हे पुण्यात आले होते, त्यांच्या उपस्थितीत प्रमुख मतदारसंघ निहाय पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या तसेच बारामतीमधील कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला. पुण्यात आज मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत खडकवासला, भोर, मुळशी तालुक्यातील काही स्थानिक कार्यकर्त्यांचे प्रवेश पार पडले. आगामी मनपा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हे पक्ष प्रवेश झाले. तसेच यावेळी काही नवीन नियुक्त्याही जाहिर करण्यात आल्या.

 

गेल्या आठवड्यात शिंदे गट (Shinde Group) पुणे मनसेला खिंडार पाडणार असल्याच्या बातम्या काही माध्यमातून झळकल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मनसेने काही पक्षप्रवेश तातडीने राज ठाकरे यांच्या उपस्थितीत घडवून आणले. तसेच आजचे पक्षप्रवेश प्रामुख्याने बारामती लोकसभा मतदार संघातील असल्याचे वसंत मोरे (Vasant More) यांनी सांगितले. यावेळी इतर छोटेमोठे कार्यकर्ते देखील मनसेत दाखल झाले.

राज ठाकरे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण आहे.
राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आजच्या पक्षप्रवेश सोहळ्यात छावा ग्रुपचे (Chava Group) पै. संतोष आप्पा आखाडे (Santhosh Appa Akhade)
यांची खडकवासला विधानसभा प्रमुख (Khadakwasla Assembly Chief) म्हणून तर आप्पा दसवडकर (Appa Daswadkar)
यांची मनसे जिल्हाध्यक्ष (MNS District President) म्हणून नियुक्ती करण्यात आली.

 

Web Title :- MNS | mns raj thackeray appoints leaders in baramati constituency

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Deshmukh | शिवसेनेत प्रवेश करताच संजय देशमुखांनी केली मोठी घोषणा, म्हणाले- ‘आगामी काळात…’

Dhananjay Munde | पंकजा मुंडेंना मंत्रिपद मिळणार का? धनंजय मुंडेंनी दिले मार्मिक उत्तर

British PM Liz Truss | ब्रिटनमध्ये राजकीय भूकंप, पंतप्रधान लिझ ट्रस यांचा तडकाफडकी राजीनामा