MNS | मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी यांच्यावर अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या मशिदींवरील भोंगे (Azaan Loudspeakers) हटवण्याच्या आदेशानंतर अनेक ठिकाणी भोंग्या विना अजान झाली तर काही ठिकाणी भोंगे होते त्या ठिकाणी मनसे (MNS) कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) चालवली होती. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेत मनसे कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावल्या होत्या. तर काही जणांची धरपकड केली होती. राज ठाकरे तसेच मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनाही पोलिसांनी नोटीस बजावल्या होत्या.

 

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी पोलिसांनी मनसेच्या (MNS) नेत्यांना ताब्यात घेतले जात होते. मनसे नेते संदीप देशपांडे (MNS Leader Sandeep Deshpande), संतोष धुरी (Santosh Dhuri) हे राज ठाकरे यांच्या भेटीला शिवतीर्थ येथे पोहोचले. त्यानंतर घरातून बाहेर निघाल्यानंतर देशपांडे आणि धुरी यांना ताब्यात घेण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. मात्र दोघेही पोलिसांच्या तावडीतून निसटण्यात यशस्वी झाले. या झटापटीत महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्का लागून ती खाली पडली. यामध्ये संबंधित महिला कर्मचारी जखमी झाली. त्यामुळे शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात (Shivaji Park Police Station) संदीप देशपांडे, संतोष धुरी यांच्यावर मनुष्यवधाचा (Culpable Homicide) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. त्यानंतर आता मनसे नेत्यांनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

संदीप देशपांडे काय म्हणाले ?
महिला पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचे वृत्त माध्यमांवर आले. त्यानंतर काही वेळातच संदीप देशपांडे यांनीही एक व्हिडिओ प्रसिद्ध करत घडलेला संपूर्ण घटनाक्रम सांगितला. ते म्हणाले, मी सकाळी राज ठाकरेंना भेटायला गेलो होतो. माध्यमांच्या प्रतिनिधींनी बाईट मागितला. त्यांच्याशी बोलत असताना दादर पोलीस ठाण्याचे (Dadar Police Station) पोलीस निरीक्षक कासार (Police Inspector Kasar) तिथे आले. त्यांनी मला बाजूला नेहण्याचा प्रयत्न केला. तुम्ही मला ताब्यात घेत आहात का ? असा प्रश्न मी त्यांना विचारला. गर्दी होत असल्याने बाजूला घेत आहे ताब्यात घेत नाही असं त्यांनी सांगितलं.

 

पोलीस निरीक्षक कासार यांनी माध्यमांशी बोलत असताना मला थोड्या अंतरावर घेऊन गेले.
सकाळ पासून मी कोणतही आंदोलन (Agitation) केलं नाही. मग मला कशाला ताब्यात घेत आहे असा प्रश्न विचारला.
आतापर्यंत आम्ही पोलिसांना सहकार्यच केलं आहे. अनेकदा स्वत: पोलीस ठाण्यात हजर झालो आहे. पोलिसांचा आम्ही सन्मान करतो. मी धक्काबुक्की केली, महिला पोलिसाला जखमी केलं हे कासार साहेबांनी हृदयावर हात ठेवून सांगावं. मी खोटे बोलत असेन पण सीसीटीव्ही खोटे बोलणार नाहीत. माध्यमांचे कॅमेरे खोटे बोलणार नाहीत असंही देशपांडे म्हणाले. आम्ही अटकेला घाबरत नसून मी कोठेही पळून गेलो नाही. कायदेशीर सल्ला (Legal Advice) घेण्यासाठी आलो असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

Web Title :- MNS | mns sandeep deshpande charged with culpable homicide strict police action

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा