मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MNS | शिवसेनेच्या (Shivsena) दसरा मेळाव्यातील (Dasra Melava 2022) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भाषणाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असतानाच त्यांच्यापूर्वी काही शिवसेना महिला नेत्यांनी केलेल्या भाषणांवरही शिवसेनेच्या विरोधकांना दखल घ्यावी लागत असल्याचे दिसत आहे. काल दसरा मेळाव्यात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनीही तडाखेबंद भाषण केले. या भाषणांवरही विरोधक टीका करत आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना मनसे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी अंधारे आणि पेडणेकर यांच्यावर असभ्य टीका केली आहे.
संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे की, ज्यांनी आमच्या देवी-देवतांना शिव्या घातल्या, ज्यांना पाहिल्यावर डोळ्यासमोर अंधारी येते असे लोक हिंदुत्वाबद्दल शिवतीर्थावर (Shivartirtha) काल बोलत होते. एक रणरागिणी, एक दिवसाची नर्स… यांचा मेंदू डोक्यात आहे की गुडघ्यात? हे कळत नाही. दुसरीला पाहिलं की अंधारी येते डोळ्यासमोर आणि त्यांच्याकडून शिवसैनिकांनी (Shiv Sainik) हिंदुत्व शिकायचं? कुठे अधोगतीला नेताय शिवसेना? बाळासाहेबांचे विचार कुठे होते? (MNS)
संदीप देशपांडे यांनी पुढे म्हटले की, एकनाथ शिंदेंना (CM Eknath Shinde) शिव्या घालायच्या, 40 आमदारांना शिव्या घालायच्या… सगळ्यांनी तुमच्याच पाठीत खंजीर खुपसला तुम्ही कोणाच्या खुपसला नाही का? सगळे वाईट, तुम्ही एकटेच चांगले… का चांगले? तर तुम्ही महानगरपालिकेत भ्रष्टाचार केला, तुम्ही मुंबईतील लोकांना आयुष्यभर खड्ड्यात चालायला लावलं.
ते पुढे म्हणाले की, मुंबईची रोज तुंबई होत असताना तुम्ही हातावर हात धरून बसलात. कोरोनात जनता होरपळली होती तेव्हा तुम्ही घरी बसला होता. कशासाठी म्हणायचं तुम्हाला चांगलं?
Web Title :- MNS | mns sandeep deshpande slams shivsena uddhav thackeray and kishori pednekar
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Heartburn | छातीत जळजळ किंवा Heartburn का होते, जाणून घ्या याची लक्षणे आणि बचावाचे उपाय