Pune : वाढीव वीज बिलाविरोधात मनसेचा मोर्चा ! शहरप्रममुखांसह कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   वाढीव वीज बिलाविरोधात मनसे सेना आक्रमक झाली आहे. या आंदोलनाआधीच पोलिसांनी शहरप्रमुख अजय शिंदे यांच्यासह ५०-६० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. तसंच त्यांना फरासखाना पोलिस ठाण्यात घेऊन गेले. परिणामी, आक्रमक झालेल्या मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यासमोरच धरणे आंदोलन सुरु केलं. वाढीव वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी मनसेकडून आज बुधवारी पुण्यातील शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय या दरम्यान मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमा होणार म्हणून अजय शिंदे यांना या संदर्भात पोलिसांनी आधीच नोटिस बजावली होती. आज सकाळी आंदोलनाच्या वेळी कार्यकर्ते आक्रमक झाले. यावेळी ५०-६० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर आंदोलनस्थळी मनसे नेते राजेंद्र उर्फ बाबू वावसकर, रुपाली पाटील ठोंबरे यांनी मनसे कार्यकर्त्यांसह धरणे आंदोलन केले .

“जोपर्यंत आमचे निवेदन जिल्हाधिकारी स्वीकारत नाहीत, तोपर्यंत येथून हलणार नाही” अशी आग्रहाची भूमिका मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी घेतली.

You might also like