महाराष्ट्र बँके विरुद्ध मनसेचे आज बोंबमारो आंदोलन संपन्न

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – नांदेड येथे मनसे कडून बोंब मारो आंदोलन महाराष्ट्र बँक समोर झाले आहे.शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लागावे म्हणून राज ठाकरे यांचे अतोनात प्रयत्न महाराष्ट्र मध्ये शेतकऱ्यांना दिसतात त्याच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्य करते महाराष्ट्र मध्ये अजूनही कार्य करणारे कार्यकर्ते सत्ता नाही.म्हणून पक्ष न सोडता एक निष्ठतेने मनसे सोबत काम करतात नुकतेच नांदेडला मनसे कडून बोंब मारो आंदोलन पार पडले.

शेतकऱ्यांचे कृषी कर्ज पुनर्गठन न करणे, कर्ज न देणे, कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांकडून कर्जाची वसुली करणे असा मनमानी कारभार चालवत शासनाचे ध्येयधोरणे पायदळी तुडविणाऱ्या महाराष्ट्र बँके विरुद्ध मनसेने आज बोंबमारो आंदोलन केले. मनसेच्या आंदोलनामुळे बँक प्रशासनाचे धाबे दणाणले .महाराष्ट्र बँक प्रशासनाकडून शासनाच्या आदेशाची पायमल्ली होत आहे. जिल्हाधिकारी यांच्याही आदेशाला केराची टोपली दाखविली जात आहे.

जिल्ह्यात दुष्काळ जाहीर असताना, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असतानाही शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली केली जात आहे. विशेष बाब ही की कर्ज वसुलीच्या पावत्या दिल्या जात नाहीत. हा सगळा प्रकार शेतकऱ्यांची आर्थिक व मानसिक कोंडी करणारा आहे असा आरोप करत मनसेने आज या विरोधात बोंब मारो आंदोलन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष मोन्टीसिंग जहागीरदार, शहराध्यक्ष शफिक अब्दूल , संतोष सुनेवाड, मनविसे जिल्हाध्यक्ष राजू पाटील बरडे, महिला जिल्हा अध्यक्ष सुरेखा पाटील, गजानन चव्हाण व अनेक राज ठाकरे प्रेमी व मनसे प्रेमी उपस्थित होते