‘त्या’ ट्विटवरुन मनसेचा ‘यूटर्न’, चूक लक्षात येताच ‘स्पष्टीकरण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोहिनूर मिल प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसूली संचलनालयाने (ईडी) नोटीस बजावली होती. त्यानंतर राज ठाकरे यांची ईडीने साडेआठ तास चौकशी करण्यात आली. परंतू मनसेनेच आता ईडीला नोटीस पाठवली होती. परंतू ही ट्विट मनसेकडून नंतर डिलिट करण्यात आले.
mns

मनसेने या संबंधात ट्विट केले होते की, मनसेची ईडीला नोटीस, सक्त वसुली संचलनालयचे फलक मराठीतून असायला हवे, हे ईडी कार्यालय बहुदा विसरले आहे. यासंबंधित तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून त्या नोटीसाची प्रत ईडीला देखील पाठवली आहे. यानंतर मनसेले सवाल केला आहे की, त्याचप्रमाणे आता मराठी भाषा विभाग ईडीला आता मराठी फलकाची सक्ती करणार का? मात्र नंतर हे ट्विट मनसेकडून बदलण्यात आले.

या आधी मनसेने महाराष्ट्रात दुकानांच्या नावाचे फलक मराठीत असावे यासाठी आंदोलन केले होते. राज ठाकरे यांना कोहिनूर मिल प्रकरणी ईडीने नोटीस बजवली होती. त्यानंतर त्यांची चौकशी देखील करण्यात आली. परंतू आता मनसेनेच थेट ईडीला नोटीस पाठवली आहे. त्यात मनसेकडून ईडीकडे मराठी फलक लावण्याची मागणी केली आहे. परंतू नंतर हे ट्विट डिलीट करण्यात आले.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like