उल्हासनगर प्रांताधिकाऱ्याच्या वाहनावर हल्ला, मनसेच्या पदाधिकाऱ्याला अटक

उल्हासनगर : पोलीसनामा ऑनलाईन – सरकारी आरक्षित भूंखंडावर बांधकाम होत असल्याच्या तक्रारीची दखल न घेतल्याचा आरोप करत मनसेचे विभाग प्रमुख योगीराज देशमुख यांनी प्रांत अधिकारी जगतसिंग गिरासे यांच्या गाडीवर मंगळवारी (दि. 24) दुपारी दगडाने हल्ला केला. या प्रकरणी एकच खबळळ उडाली आहे. दरम्यान प्रतांधिकारी गिरासे यांनी देशमुख यांची तक्रारी फेटाळून लावल्या आहेत. कोरोना काळात ते आपल्याकडे आलेच नाहीत. तसेच त्यांचे कोणतेही अर्ज अथवा तक्रार प्रलंबित नसल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणी प्रातांधिकारी गिरासे यांच्या तक्रारीवरून देशमुख यांच्यावर मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आले आहे. दरम्यान योगीराज देशमुख यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला असून यामध्ये राज्य शासनाच्या आरक्षित भूखंडावर शासनाचा नाम फलक लावला असताना अवैध बांधकाम सुरू आहेत. अशी तक्रार प्रांत कार्यालयाकडे केली. मात्र या तक्रारीकडे प्रांत अधिकारी कार्यालय दुर्लक्ष करीत असून मला कार्यालयात येण्यास मज्जाव केल्याचे व्हिडिओत म्हटले. मंगळवारी याबाबत विचारण्यासाठी आपण प्रांत कार्यालयात गेल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली यानिषेधार्थ आपण प्रांताधिका-याच्या गाडीवर हल्ला केल्याची कबुली दिली आहे. या हल्ल्याने, प्रांत कार्यालयातील कारभारावर टीकेची झोळ उठली आहे. मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी प्रांत अधिकारी यांच्या गाडीवरील हल्ल्याचा निषेध केला असून पक्षश्रेष्ठी पुढील निर्णय घेणार असल्याचे संकेत दिले आहे.