home page top 1

६ लाखाच्या खंडणी प्रकरणी मनसे पदाधिकाऱ्याला अटक 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नवी मुंबईत कामोठे परिसरात मनसेच्या पदाधिकाऱ्याने सिडकोच्या निवृत्त अधिकाऱ्याला सहा लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी मनसे पदाधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. मिलिंद खाडे असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे.

कामोठेत राहणारे धर्मा जोशी यांनी घराच्या बांधकामात अडथळा येऊ नये म्हणून त्यांनी झाडे तोडली होती. हा प्रकार मिलिंद याला कळताच त्याने सदर ठिकाणी जाऊन फोटो मिळवले. या आधारे मिलिंद हा जोशी यांना पनवेल महापालिकेद्वारे कठोर कारवाई करून सर्व वर्तमान पत्रात बातम्या छापून आणेल आणि सिडकोचेच निवृत्त अधिकारी कसे नियमांची पायमल्ली करतात म्हणून बदनामी करेल अशी धमकी दिली. असे न करण्याच्या बदल्यात त्याने जोशी यांच्याकडे ६ लाखांची मागणी केली. मात्र मी पैसे देणार नाही, कारण मी कुठलेही नियम तोडले नाहीत, असे म्हणत जोशी यांनी या प्रकरणी गुन्हे शाखा उपायुक्त तुषार दोशी यांच्याकडे तक्रार केली.

गुन्हे शाखा उपायुक्त दोशी यांनी तत्काळ कारवाई करत खंडणी विरोधी पथक वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा रचून मिलिंद खाडेला अटक केली. खाडेला ११ फेब्रुवारीपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, जोशी यांनी पोलिसांच्या मार्गदर्शनानुसार अडीच लाखांचा पहिला हप्ता देण्यासाठी खाडे यांना बोलावले आणि त्यात खाडे अडकला, अशी माहिती शिरीष पवार यांनी दिली.

Loading...
You might also like