MNS On CM Uddhav Thackeray | मनसेची शेलक्या शब्दात टीका; मुख्यमंत्र्यांची अवस्था शोलेमधल्या ‘असरानी’ सारखी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MNS On CM Uddhav Thackeray | औरंगाबादमध्ये (Aurangabad) आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांची तोफ धडाडणार आहे. आपल्या भाषणात ते कोणावर निशाणा साधणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. याशिवाय मशिदीवरील भोंग्या संदर्भात (Azaan On Loudspeakers) ते काय भूमिका मांडणार हे देखील स्पष्ट होणार आहे. दरम्यान 1 मेच्या पूर्वसंध्येला शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधला. हिंदूंमध्ये फोडाफोड आणि महाराष्ट्रात मराठी – अमराठी असा भेदभाव करण्यामागे भाजप असल्याचा आरोप करत आपण महाराष्ट्र दौरा करणार आसल्याची ग्वाहीही त्यांनी दिली आहे. त्याचबरोबर हिंदुत्त्वाच्या (Hindutva) मुद्द्यावरून त्यांनी राज ठाकरे यांच्यावरही टीका केली. त्यांच्या या टीकेला आता मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी उत्तर दिले आहे. संदीप देशपांडे एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. (MNS On CM Uddhav Thackeray)

 

एका वृत्तवाहिनीशी बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांची अवस्था शोलेमधल्या (Sholay) असरानीसारखी (Asrani) आहे. अर्धे मनसेवर तुटून पडा, अर्धे भाजपावर तुटून पडा आणि आम्ही घऱात बसतो अशी अवस्था आहे. गुढीपाडव्याच्या सभेआधी आम्ही सांगितलं होतं की, ही सभा महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलेल. यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले. आजची सभा ही ऐतिहासिक सभा असणार आहे. संभाजीनगर (Sambhajinagar), महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाचे या सभेकडे लक्ष लागले आहे. सभेत राज ठाकरे कोणते मुद्दे मांडणार याची सर्वांना उत्सुकता आहे. (MNS On CM Uddhav Thackeray)

गुढीपाडव्याच्या (Gudipadva) सभेला दिलेल्या 3 तारखेच्या अल्टिमेटमसंबंधी बोलताना देशपांडे म्हणाले की, राज ठाकरे यांनी कायदा पाळा (Follow the Law) असे सांगितले आहेत. आणि सरकारने तो पाळला पाहिजे. हिंदुत्त्ववादी सरकारने आम्हाला धमक्या देण्याऐवजी जे लोक कायदा पाळत नाही त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत दाखवावी. आम्हालाही राज ठाकरे यांच्या सभेची उत्सुकता आहे. ते काय बोलणार हे आधीच कोणीही सांगू शकत नसल्याचेही देशपांडे म्हणाले.

 

उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्रभर दौरा
शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना सरकारची कामे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आदेश दिले आहेत.
ते म्हणाले, इतरांपेक्षा शिवसेना कशी वेगळी आहे हे दाखवण्यासाठी शिवसंपर्क अभियान (Shiv Sampark Abhiyan) आहे.
या अभियानाच्या माध्यमातून सरकारची कामे लोकांपर्यंत पोहोचवा. लोकांसाठी शिवसेना (Shivsena) काय करत आहे याबाबत जागरूकता निर्माण करा. धोका पत्करून मी शस्त्रक्रिया केली आहे. त्यातून बरा होत आहे. येत्या 14 मे ला मुंबईत तर 8 जूनला मराठवाड्यात सभा घेणार असून संपूर्ण महाराष्ट्र फिरणार असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

 

Web Title :- MNS On CM Uddhav Thackeray | mns sandeep deshpande on maharashtra cm uddhav thackeray hindutva

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा