×
Homeताज्या बातम्याMNS On Shinde-Fadnavis Government | मनसेची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका, पालकमंत्र्यांची निवड आणि...

MNS On Shinde-Fadnavis Government | मनसेची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका, पालकमंत्र्यांची निवड आणि शिंदे गटातील घराणेशाहीवर भाष्य

ठाणे : शिंदे-फडणवीस सरकारने (MNS On Shinde-Fadnavis Government) नुकतीच सर्व जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती जाहीर केली. यामध्ये एकाच मंत्र्याकडे अनेक जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवाय, जिल्ह्याबाहेरील नेत्याला पालकमंत्री (Guardian Minister) करण्यात आले आहे. तसेच शिंदे गटाने (Shinde Group) नुकतीच त्यांची युवासेनेची राज्य कार्यकारिणी (Yuva Sena Executive) जाहीर केली यामध्ये नेते आणि आमदारांच्या मुलांना संधी देऊन घराणेशाही वाढवली आहे. या दोन मुद्द्यांवरून मनसेने शिंदे-फडणवीस सरकारवर टीका (MNS On Shinde-Fadnavis Government) केली आहे. मनसे आमदार राजू पाटील (MLA Raju Patil) यांनी ही टीका कल्याणमध्ये बोलताना केली.

अंबरनाथमध्ये मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर (Kunal Bhoir) यांनी आयोजित केलेल्या नवरात्रोत्सवाला भेट देण्यासाठी मनसे आमदार राजू पाटील आले होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर मत मांडले. पालकमंत्री निवडीवरुन नाराजी व्यक्त करताना ते म्हणाले, पालकमंत्री हा जिल्ह्यातील स्थानिक मंत्रीच असावा. शिंदे-फडणवीस सरकारने शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांना ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिले आहे. पालकमंत्री हा त्या जिल्ह्यातील स्थानिक मंत्री असावा, पण कुठेतरी काहीतरी गडबड दिसतेय, सगळे काही व्यवस्थित चालू नसून त्याचाच परिपाक म्हणून या घटना घडताना दिसत आहेत. (MNS On Shinde-Fadnavis Government)

तसेच शिंदे गटाने युवासेनेतील पदाधिकार्‍यांच्या केलेल्या निवडीवर राजू पाटील म्हणाले, शिंदे गटात घराणेशाही नवीन कुठेय? सात-आठ वर्षे झाली, बघतोच आहोत आपण, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (MP Dr. Shrikant Shinde) यांना टोला लगावला.
ते पुढे म्हणाले, हा त्यांचा प्रश्न असला, तरी प्रत्येक पक्षाने कार्यकर्त्याला संधी द्यायला पाहिजे.
सध्या जी गटबाजी चालू आहे, ती दोन्ही गटांसाठी आणि महाराष्ट्राच्या पुढील भवितव्यासाठी चांगली नाही.

यावेळी राजू पाटील यांनी दावा केला की, मनसेच्या मदतीशिवाय कल्याणचा पुढील खासदार होणार नाही.
ते म्हणाले, मी आमदारकीलाही उभा राहणार नव्हतो, राजसाहेब म्हणाले म्हणून उभा राहिलो,
त्यांनी सांगितले खासदारकीला उभा राहा, तर राहणार. मनसे लोकसभा लढवणार नाही हे आधीच जाहीर केले होते,
पण आता इथे जो कुणी खासदार होईल, तो मनसेची दखल घेतल्याशिवाय, मनसेच्या मदतीशिवाय होणार नाही,
हे नक्की, असे म्हणत राजू पाटील यांनी शिंदे यांना इशारा दिला.

Web Title :- MNS On Shinde-Fadnavis Government | ambarnath news kalyans next mp will not be without mnss help says mns mla raju patil

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Minor Girl Rape Case | जीवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार; सिंहगड रोड परिसरातील घटना

Policeman Suicide | पोलीस कर्मचाऱ्याची सर्व्हिस रायफल मधून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News