MNS on Shivsena | मनसेचा शिवसेनेवर हल्लाबोल; म्हणाले – ‘शिवसेनेनं त्यांचा धनुष्यबाण काँग्रेस, राष्ट्रवादीकडे गहाण ठेवल्याने…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MNS on Shivsena | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या नियोजित अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज (मंगळवारी) दादरमधील शिवतीर्थ या ठिकाणी मनसेचे नेते आणि पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली. यानंतर मनसे प्रवक्ते हेमंत कांबळे (Hemant Kamble) यांनी शिवसेना (Shivsena) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘स्वत:ला गदाधारी म्हणणाऱ्या शिवसेनेने त्यांचा धनुष्यबाण हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे गहाण ठेवला आहे,’ असा टोला त्यांनी लगावला आहे. (MNS on Shivsena)

 

14 तारखेच्या सभेवरून बॅनरबाजी केली जातेय की आ रहे है गदाधारी. घंटाधारीवर गदाधारींचा प्रहार अशी बॅनरबाजी शिवसेनेनं केली आहे,” असं म्हणत माध्यमांनी हेमंत कांबळे यांना सवाल विचारला असता. त्यावर कांबळे म्हणाले की, ”शिवसेनेचा गोंधळ उडालेला आहे. हिंदुत्व आणि सेक्युलरिझम यामध्ये नेमकं कुठे जायचं आहे हे त्यांना कळत नाहीये. ज्या धनुष्यबाणाच्या चमत्काराने बाळासाहेब ठाकरेंनी या देशात हिंदू या शब्दाला अर्थ दिला, मला वाटतं उद्धव ठाकरे या शब्दाला विसरलेत,” असं ते म्हणाले. (MNS on Shivsena)

 

”2019 च्या निवडणुकीनंतर भाजपासोबतची (BJP) युती तोडून, राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसच्या (Congress) मांडीवर जाऊन बसल्यावर त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला हिंदुत्ववादी बनवलं की शिवसेना सेक्युलरवादी झाली हा मोठा प्रश्न आहे. आता ते गदाधारी म्हणतील, तलवारधारी म्हणतील, त्रिशूलधारी होतील कदाचित सुदर्शन चक्रधारी होतील. पण त्यांचा धनुष्यबाण त्यांनी कुठेतरी काँग्रेस, राष्ट्रवादीकडे गहाण ठेवलाय. त्यामुळे त्यांना हे गदाधारी हिंदुत्व आणि अशाप्रकारचा स्वीकार करावा लागतोय,” असं हेमंत कांबळे यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- MNS on Shivsena | mns leader hemant kamble slams shivsena and uddhav thackeray

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा